यशासोबत शत्रूही वाढतात, कंगनाने रणवीर सिंगला खास सल्ला देत व्यक्त केली प्रतिक्रिया – Tezzbuzz
रणवीर सिंग हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट दिली आहेत. तसेच धुरंधर या चित्रपटामुळे मुळे त्याला खुप प्रसिद्धी मिळाली तर तो आता एक चित्रपटाच्या संबधीत वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. तर हे कारण म्हणजे ‘डॉन 3’ वरून रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद चर्चेत आहे. रणवीर सिंगला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने असहकाराची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच तापले आहे. अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत, इतकेच नव्हे तर चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजवर खटला दाखल करण्याचीही तयारी दर्शवली आहे.
तर आता याच संबधी कंगना (kangana)रणौतने पण यावर तिने तिचे मत मांडले आहे. कंगना रणौत हि सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान तिने एक मुलाखती दरम्यान ती, रणवीर सिंग आणि ‘डॉन 3’ च्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “सर्वांनी माझ्यावर बंदी घातली आहे. जेव्हा तुमचा दर्जा वाढतो, तेव्हा तुमचे शत्रूही वाढतात. त्यामुळे, शत्रूंशिवाय तुमचा दर्जा वाढणे अशक्य आहे. तर अश्यावेळी त्याने घाबरुन किंवा गोंधळुन जावु नये.
कंगना पुढे म्हणते की, आव्हाने ही यशाचा एक नैसर्गिक भाग आहेत आणि या आव्हानांमुळे कोणीही खचून जाऊ नये. तयार आता कंगना तिच्या भारत भाग्य विधाता या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आणि हा चित्रपट 26/11 या हल्याच्या घटने संबधीत आहे. तर या चित्रपटाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रणवीर सिंगच्या समर्थनार्थ पुढे आली कंगना रणौत; म्हणाली, “जसा दर्जा वाढतो, तसे शत्रूही वाढतात.”
Comments are closed.