अरिजित सिंगला ह्या गाण्यामुळे मिळाली खरी ओळख; तर इम्रान हाश्मीच्या रोमांसने केली कमाल – Tezzbuzz
अरिजित सिंग हा एक लोकप्रिय सिंगर आहे. त्याने आज पर्यत अनेक उत्तम गाणि गायली आहेत. ‘तुम ही हो’, ‘अपना बना ले’, ‘सनम रे’, ‘तू है तो मैं हूँ’ आणि ‘ओ माही’ यांसारख्या त्याच्या गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेड लावले. तर आज गायक अरिजित सिंग याचा वाढदिवस आहे. तो आता त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या आवाजाने, गाण्याने एक वेगळच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याच्या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध होतात. आज आपण या प्रसिद्ध गायकाच्या त्या गाण्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने त्याला ओळख मिळवून दिली.
अरिजित (arijit)सिंगच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात ‘मर्डर 2’ मधील ‘फिर मोहब्बत’ ह्या गाण्यने झाली आहे. आणि त्यामध्ये इम्रान हाश्मीसोबत चित्रित झालेले हे हृदयस्पर्शी गाणे आहे. त्यातील भावना कथा या गाण्यातुन व्यक्त होते. तसेच अरिजित सिंग याच्या आवाजाने हे गाणे उत्तम गाजले. जरी हे त्याचे पहिले रेकॉर्ड केलेले गाणे नव्हते, तरीही हे त्या प्रमुख गाण्यांपैकी एक ठरले, ज्यामुळे त्याचा आवाज अधिक लोकांपर्यंत पोहोचला. आणि लोकप्रियता मिळाली. आणि त्यानंतर त्यांची लोकप्रियता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत राहिली.
मात्र अरिजित सिंगने 27 जानेवारी 2026 रोजी पार्श्वगायनातून निवृत्ती घेतली. त्यामुळे सर्व चाहते नाराज झाले. त्याने सोशल मिडीयावर पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. तर अरिजित सिंगला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आठ फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर आता त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला साोशल मिडीयावर वावाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Comments are closed.