कृष्णावतारम भाग १: हृदयम भावनिक कथा थरली हिट, ओपनिंग डे ला जोरात कमाई – दैनिक बॉम्बबॉम्ब

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर खुप आधी पासुन या धार्मिक मालिका, चित्रपट यांची क्रेझ ही कायम आहे. तर आता भगवान कृष्णाच्या कथेवर एक चित्रपट सादर झाल आहे. आणि तो चित्रपट प्रंचड गाजतोय.

प्रेक्षकांचे भगवान कृष्णाच्या कथेसोबत आधीपासूनच एक भावनिक नाते आहे. भगवान कृष्णावर आधारित सर्व चित्रपट आणि टीव्ही मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कृष्णावतारम पार्ट 1 हृदयम’लाही तसाच प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये आधीच मोठी चर्चा निर्माण करत आहे. गुरुवार, 7 मे रोजी प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आले होते. तसेच हा चित्रपट 8 मे रोजी प्रदर्शित झाला. सिद्धार्थ गुप्ता, संस्कृती जयन्ना आणि सुष्मिता भट्ट (bhat)यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जाहीर झाली आहे. चला तर मग पाहूया की त्याने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.

‘कृष्णावतारम पार्ट 1: हृदयम’ हा चित्रपट गुरुवार, 8 मे रोजी झालेल्या पेड प्रीव्ह्यूनंतर गुरुवार 7 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पेड प्रीव्ह्यू दरम्यान त्याने बॉक्स ऑफिसवर 40 लाख जमा केले. मात्र प्रदर्शनानंतर त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.15 कोटी कमावले आणि आतापर्यंत 1549 शोजमध्ये 1.88 कोटी कमावले आहेत. तर यामध्ये कोणतीही लोकप्रिय स्टारकास्ट नाही तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरत आहे.

‘दलदल’मध्ये अडकले जयदीप अहलावत, अभिनेत्याच्या इंटेन्स लुकने वेधलं लक्ष

Comments are closed.