डॉक्टरकी सोडून अभिनयात केली एन्ट्री; आता भव्य चित्रपट ‘रामायण’चा भाग बनली ही साऊथ स्टार – Tezzbuzz

साई पल्लवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहे. तिने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत. तसेच ते प्रेक्षकांना भावले सुद्धा आहेत. आणि तिचे एक वेगळेपण आहे. ती एवढी मोठी हीरोइन असूनही नेहमी मेकअप करण्याचे टाळते आणि छोटे कपडे सहसा घालत नाही. तर ती आत्ताच एका चित्रपटामुळे चर्चा झाली होती तो म्हणजे एक दिन. आणि तिचा आगामी चित्रपट म्हणजे रामायण. 4000 कोटींच्या ‘रामायण’ चित्रपटात दिसलेली साई, नैसर्गिकरित्या सुंदर आहे आणि कोणत्याही शस्त्रक्रियेशिवायही ती अप्रतिम दिसते. सीताची भूमिका केली आहे. तरी आज या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.

साई पल्लवी एक बहुगुणी अभिनेत्री आहे. तिची कारकीर्द याचा पुरावा आहे. तिने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि जॉर्जियामधून एमबीबीएस पूर्ण करून ती डॉक्टर बनली. नंतर, एका डान्स रिॲलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर, तिने अभिनयाला आपले करिअर म्हणून निवडले. तिला ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून यश मिळाले. तसेच ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. ‘फिदा’ आणि ‘लव्ह स्टोरी’ सारख्या चित्रपटांमधील तिच्या नृत्य सादरीकरणाचे खूप कौतुक झाले.

साई पल्लवी  हिने ‘एक दिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. साई पल्लवी आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण‘ (ramayan)या चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे. हा एक भव्य चित्रपट आहे. तर या चित्रपटाची आणि साई पल्लवी हिच्या एका छलकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘दलदल’मध्ये अडकले जयदीप अहलावत, अभिनेत्याच्या इंटेन्स लुकने वेधलं लक्ष

Comments are closed.