‘मिर्झापूर: द मूव्ही’ मधील या गाण्याची जोरदार चर्चा, लवकरच चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला – Tezzbuzz
‘मिर्झापूर’ या सीरीजला ओटीटीवर खरभोस प्रेम मिळाल्यानंतर ‘मिर्झापूर’ द फिल्म या नावाचा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येत आहे. ‘मिर्झापूर: द मुव्ही’ 4 सप्टेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच याला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्रही मिळाले आहे. चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक असताना आता प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर ही उत्सुकता आजुण वाढवण्यासाठी निर्मात्यांनी एक पार्टी ट्रॅक घुम घुम हा प्रदर्शित केला आहे.
या नव्याने प्रदर्शित झालेल्या विशेष डान्स नंबरमध्ये अभिनेत्री सोनल चौहान एका ग्लॅमरस आणि उत्साहात दिसत आहे. यात सोनल, रवी किशन, दिव्येंदू दिसुन येत आहेत. सोनल तिच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेत आहे. तिन्ही कलाकारांची अनोखी शैली आणि पडद्यावरील जबरदस्त केमिस्ट्री या गाण्याला एक परिपूर्ण व्यावसायिक चार्टबस्टर बनवते.
घुम घुम हे गाणे अगदी जोश पुर्ण आहे. हे गाणे प्रसिध्द गायिका रश्मीत कौर आणि संगीतकार रे यांनी गायले आहे. रे यांनी उत्तम रित्या संगीत बध्द केले असुन हे कुमार यांनी जोशपूर्ण गीत लिहिले आहे. तर निर्मात्यांनी 4 संप्टेबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची आठवण करत हे गाणे सोशल मिडीयावर रिलीज केले आहे.
य चित्रपटात पंकज (pankaj)त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याव्यतिरिक्त, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, प्रमोद पाठक, श्रिया पिलगावकर आणि मोहित मलिक यांसारखे अनुभवी कलाकार चित्रपटगृहांमध्ये आपला अभिनय सादर करताना दिसतील. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होईल.
हेही वाचा
“लोक त्याच्याबद्दल जसे बोलतात…’ अक्षय ओबेरॉयने शाहरुख खानबाबत ‘किंग’च्या सीटवरून किस्सा केला शेअर
Comments are closed.