साई पल्लवी अभिनीत ‘एक दिन’ या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित – Tezzbuzz

साई पल्लवी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या साधेपणामुळे आणि उत्तम चित्रपटामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आणि आता ती सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा आगामी चित्रपट म्हणजे ‘एक दिन’ आहे. तर आता या चित्रपटाचा दुसरा अधिकृत ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात साई पल्लवीसोबत जुनैद खानही मुख्य भुमिकेत आहे. आणि या निमित्ताने जुनैद खान आणि साई पल्लवी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

‘एक दिन’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन असे दिसुन येते की हा चित्रपट एक प्रेम कथा सांगतो. तर या 2 मिनिटे 54 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये आमिर खानचा मुलगा, जुनैद खान, एका लाजाळू तरुणाच्या भूमिकेत आहे. जो साई पल्लवीच्या प्रेमात पडतो. ट्रेलरमध्ये हे देखील उघड होते की, ते दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करतात आणि तिच्याशी बोलण्यासाठी धाडस गोळा करण्यासाठी जुनैदला संघर्ष करावा लागतो. मात्र, जेव्हा जपानमध्ये एका अपघातात साई पल्लवीचा मृत्यू होतो आणि तिला क्षणिक जागतिक विस्मृती येते, तेव्हा कथेला एक अनपेक्षित वळण मिळते. तर ही कथा पुढे कशी वळण घेते हे पाहण्यासारखे राहिल.

साई (sai)पल्लवी अभिनीत ‘एक दिन’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले आहे. तर आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कन्नड स्टार यशने केला खुलासा, ‘हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटासारखा आहे’

Comments are closed.