‘रामायण’मधील विभीषणचा वेदनादायक शेवट, 10 वर्षांपूर्वी जगाचा घेतला होता निरोप – Tezzbuzz

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर रामानंद सागर यांनी असंख्य चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली असली तरी, जेव्हा ‘रामायण’ हि मालिका आजही तितकिच लोकप्रिय आहे. तर यातील कलाकार अनेक वर्षे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाच खरे प्रभू राम आणि देवी सीता मानत होते. याच मालिकेत ‘विभीषण’ची भूमिका साकारणारे मुकेश रावल हे देखील प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होते. मात्र, 10 वर्षांपूर्वी ‘रामायण’मधील या रामभक्ताबद्दल एक अशी बातमी समोर आली, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला.

मुकेश (mukesh)रावल हे एक प्रसिद्ध गुजराती, टीव्ही अभिनेते होते. मात्र त्याना खरी प्रसिध्दी हि ‘रामायण’मधील  विभीषणाची भुमिका साकारुन मिळाली. आज त्यांच्या या भुमिकेला विसरु शकले नाहीत. मुकेशला सुरुवातीला मेघनादची भूमिका करायची होती, त्यामुळे रामानंद सागर यांनी त्या भूमिकेसाठी त्याची ऑडिशन घेतली. मात्र, त्यांना विभीषणाची ऑडिशन जास्त आवडली आणि त्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. आणि आज ही हे पात्र लोकच्या मनात जिंवत आहे.

मुकेश रावल 2016 मध्ये निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश रावल कांदिवली रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळ ओलांडत असताना ट्रेनची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की, त्यांचा मृतदेह अनेक तास रुळांवर पडून होता. 15 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी, जेव्हा कांदिवली स्टेशन मास्तरने त्यांचा मृतदेह रुळांवर पडलेला पाहिला आणि त्यांने पोलीसांना माहिती दिली. अश्या प्रकारे त्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या चाहत्याना प्रंचड धक्का बसला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘दोन चित्रपटांनंतर स्वतःला सुपरस्टार समजू नका, अमिषा पटेलचा यंग अभिनेत्रींना सल्ला

पोस्ट ‘रामायण’मधील विभीषणचा वेदनादायक शेवट, 10 वर्षांपूर्वी जगाचा घेतला होता निरोप वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.

Comments are closed.