बीसीसीआयच्या संभाव्य यादीत वैभव
सूर्यकुमार यादव, शुभमन गिलला स्थान नाही
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
19 सप्टेंबर 4 ऑक्टोबर दरम्यान नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सादर केलेल्या संभाव्य 30 सदस्यांच्या यादीमध्ये सूर्यकुमार यादव किंवा शुभमन गिल यांना वगळले असून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ही प्रत्येक 4 वर्षांनी भरविली जाते.
भारताच्या विद्यमान टी-20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे तर कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. दरम्यान विंडीजचा संघ याच कालावधीत भारतात मालिका खेळण्यासाठी येणार असल्याने बीसीसीआयने या मालिकेसाठी तसेच आशियाई स्पर्धेसाठी टी-20 चे दोन स्वतंत्र संघ निवडण्याची गरज असल्याचे सांगितले. विंडीजचा संघ 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान भारताबरोबर तीन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आशियाई स्पर्धेतील क्रिकेट हा प्रकार 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान खेळविला जाणार आहे,. बीसीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सादर केलेले 30 सदस्यांची यादी पुढील प्रमाणे…
यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किसन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जसप्रित बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, नितीशकुमार रे•ाr, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती, अंकुल रॉय, आयुष बदोनी, हर्ष दुबे, ध्रुव ज्युरेल, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, रवी बिस्नोई, शाहबाज अहमद, शुभम दुबे, विपराज निगम, हर्षित राणा, यश ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर.
Comments are closed.