हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा
वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत: सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वैभवची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएलनंतर आता त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय अ संघासोबत तो श्रीलंकेत दाखल झाला असून, विमानतळावर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड
भारतीय अ संघ 9 जूनपासून श्रीलंकेत होणाऱ्या तिंरगा एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ श्रीलंकेत पोहोचल्यानंतर विमानतळाबाहेर वैभव सूर्यवंशीला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. वैभव विमानतळातून बाहेर येत असताना काही श्रीलंकन चाहते त्याच्याजवळ वारंवार येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्याने शांतपणे प्रतिसाद दिला, मात्र चाहत्यांची गर्दी वाढत गेल्याने तो काहीसा अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. शेवटी त्याने हात जोडून चाहत्यांना थोडे दूर राहण्याची आणि स्वतःला थोडी जागा देण्याची विनंती केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीलंकेत आल्यानंतर वैभव सूर्यवंशी थकलेला दिसत होता. 🙏
15 वर्षांचा मुलगा सतत कॅमेरा, फोटो विनंत्या आणि चाहत्यांनी वेढलेला होता. एका क्षणी, त्याने हात जोडून लोकांना त्याला थोडी जागा देण्यास सांगितले.
लोक विसरतात की तो अजूनही लहान आहे. 😑😑 pic.twitter.com/oSzz1pPmrE
— अभिनव MSDian™ (@Abhinav_hariom) 5 जून 2026
दांबुलामध्ये रंगणार तिंरगा मालिका
भारतीय अ संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करत आहे. या स्पर्धेतील सर्व सामने दांबुला येथे खेळवले जाणार आहेत. स्पर्धेत भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ असे तीन संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना यजमान श्रीलंकाविरुद्ध होणार आहे. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळवून देण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी निवड जवळपास निश्चित
टीन सेन्सेशन वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ, भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांचा समावेश असलेल्या त्रि-राष्ट्रीय अ संघ मालिकेसाठी डंबुला येथे दाखल झाला आहे. #क्रिकेट pic.twitter.com/VidKTpjdLL
— निब्राझ रमजान (@nibraz88cricket) 5 जून 2026
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने अनेक अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध निर्भीड फलंदाजी केली. त्यामुळे त्याला लवकरच वरिष्ठ भारतीय संघात संधी मिळावी, अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. याच कारणामुळे आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या टी-20 मालिकांसाठी वैभवच्या नावाचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. 6 जून रोजी निवड समिती या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करणार असून, त्यामध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान मिळण्याची शक्यता अत्यंत मजबूत मानली जात आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.