चेन्नईत इतिहास घडवूनही अंतिम फेरीत निराशा, जेतेपदाच्या संघर्षात वैष्णवी-ऋतुजाचा स्विस जोडीकडून धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी महिला टेनिससाठी ऐतिहासिक ठरलेल्या चेन्नई ओपन स्पर्धेत वैष्णवी अडकर आणि ऋतुजा भोसले या जोडीला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्वित्झर्लंडच्या नायमा करामोको आणि सिमोना वाल्टर या जोडीने हिंदुस्थानी आव्हान 6-2, 6-0 असे संपुष्टात आणत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

निकाल एकतर्फी दिसत असला तरी वैष्णवी आणि ऋतुजा यांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास हिंदुस्थानी टेनिससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. डब्ल्यूटीए टूर स्तरावरील दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ही पहिलीच संपूर्ण हिंदुस्थानी महिला जोडी ठरली. त्यामुळे उपविजेतेपद मिळाले असले तरी त्यांच्या कामगिरीची ऐतिहासिक नोंद झाली आहे.

अंतिम सामन्यात स्विस जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. करामोकोने नेटजवळ अप्रतिम नियंत्रण राखले, तर वाल्टरने बेसलाइनवरून अचूक फटके मारत हिंदुस्थानी खेळाडूंना अडचणीत आणले. पहिल्याच सेटमध्ये स्विस जोडीने 4-0 अशी आघाडी घेतली. वैष्णवी आणि ऋतुजाने पाचव्या गेममध्ये एक ब्रेक मिळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही.

दुसऱया सेटमध्येही परिस्थिती बदलली नाही. हिंदुस्थानी जोडीला सर्व्हिस टिकवण्यात अडचणी आल्या. अनावश्यक चुका आणि महत्त्वाच्या गुणांवर संधीचे सोने करण्यात आलेले अपयश यामुळे त्यांना एकही गेम जिंकता आला नाही. अखेर स्विस जोडीने 6-2, 6-0 असा विजय नोंदवला. या स्पर्धेत वैष्णवी आणि ऋतुजा यांनी उपांत्य फेरीत पोलंडच्या व्हेरोनिका फाल्कोव्स्का आणि अमेरिकेच्या अलाना स्मिथ यांचा 6-2, 2-6, 10-8 असा पराभव केला होता.

Comments are closed.