पैशासाठी हपापलेलं कुटुंब; घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय?, पैसा नेमका यायचा

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death Case) मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली. तसेच हगवणे कुटुंबीय किती पैशासाठी हपापलेलं आहे, हे दिसून आलं. हगवणे कुटुंबियांनी मोठी सून मयुरी हगवणे (जगताप) यांचा देखील छळ केला होता. त्यामुळे घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय?, असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे (जगताप) हिने एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे.

हगवणे कुटुंबांचा धंदा काय?

हगवणे कुटुंबियांचं उत्पनाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्याचे प्लॉट पाडून विकणे. तसेच हगवणे कुटुंबियांकडे जेसीबी, पॉकलँड अशा मशिनरी आहेत. वॉशिंग सेंटरचा व्यवसायही हगवणेंचा होता. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते, अशी माहिती हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे (जगताप) यांनी दिली.

वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यात काय काय दिलं?

वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं. हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉच्युनर गाडी दिली. 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी दिली. अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही दिली. वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला. माहेरी आल्यावर प्रत्येकवेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रुपये दिले. जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्याने छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

हगवणे यांचा व्यवसाय काय होता? मयुरी जगतापनं सगळंच सांगितलं, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=zjl_7j_cq3g

संबंधित बातमी:

Rajendra Hagawane Arrested Vaishnavi Death Case: ‘थार’पासून बलेनो गाडीपर्यंत, 7 दिवसांत गाठली 11 ठिकाणं; राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?

Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: सिलिंग फॅन, एसीमध्ये spy कॅमेरा; लाईट सुरु ठेऊन पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा; सनकी निलेश चव्हाणचे कारनामे उघड

अधिक पाहा..

Comments are closed.