सनीज वर्ल्डमध्ये वैष्णवी-शशांक यांच्या शाही लग्नाचा भव्य सोहळा; लग्नात लाखोंचा खर्च अन् शाही था

पुणे: पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला पाच दिवस उलटलेत, तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणेंना अटक का होत नाही? असा  सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आहेत, राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांना अटक होत नाही का? अशी ही चर्चा सध्या शहर परिसरात रंगलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या मोठ्या सुनेने सुद्धा नोव्हेंबर 2024 मध्ये अशाच छळाला कंटाळून पौड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणेंसह सासू, दिर आणि नंदेवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय दाबावातून त्यावेळी कारवाई झाली नाही. आता ही याच दबावामुळे ही अटकेची कारवाई होत नाहीये का? असा प्रश्न विचारला जातो आहे. 16 मे 2025 ला वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आली आहे. पण सासरे राजेंद्र आणि दिर फरार आहेत.

भव्य लग्नाबद्दल चर्चा सुरू

वैष्णवी आणि शशांक यांचा 2023 मध्ये प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोने, एक आलिशान चारचाकी गाडी, चांदीची भांडी भेट म्हणून दिली आणि सुसगाव येथील सनीज वर्ल्डमध्ये लाखो रूपये खर्च करून शाही थाटामाटात विवाह आयोजित केला होता. या भव्य लग्न सोहळ्याची आजूबाजूच्या परिसरात खूप चर्चा झाली. लग्नाच्या काही दिवसांनंतर लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. लग्नात चांदीची भांडी न दिल्याने नाराज झालेल्या तिच्या सासरच्या लोकांनी तिला अपमानास्पद बोलले. तक्रारीत असेही म्हटले आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.

शाही लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी घेतली, तसेच सनीज वर्ल्ड येथे लग्न करून देण्याच्या बोली केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाही थाट दिसून आला आहे.

वैष्णवीला हुंड्यात काय दिलं?

– 51 तोळे सोन्याचे दागिने
– चांदीची भांडी
– फॉर्च्युनर गाडी
– लग्नानंतर चांदीची मूर्ती
– नुकतंच दीड लाखांचा मोबाईल
– माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी पन्नास हजार ते 1 लाख रुपये दिले
– जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी, ते न दिल्यानं छळ आणखी वाढला

नेमकं प्रकरण काय?

राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=U3-ptr0ndd4

अधिक पाहा..

Comments are closed.