काँग्रेस पक्ष खाली करणं म्हणजे बावनकुळेंना कॅसिनोत गेम खेळण्याइतकं सोपं वाटतं का? वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad on Chandrashekhar Bawankule : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. “काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा,” असा थेट संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तर काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर करणार, असेही त्यांनी म्हटले. आता काँग्रेस (Congress) खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की,  चंद्रशेखर बावनकुळे यांना काँग्रेसला खाली करणं हे मकाऊमधल्या कॅसिनोत गेम सारखं वाटतं का? एका रात्रीत काँग्रेस खाली होईल? असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. पक्ष संपवण्याची भाषा कोणी करू नये, हे बोलणं हे उरमटपणाचं मस्तीचे उदाहरण आहे. माणसाने बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. या आधी सुद्धा त्यांच्या नेत्यांनी काँग्रेस मुक्त भारत त्यांना करायचा असं म्हटलं होतं, चारशे पारचे स्वप्न पाहणारे 240 वर थांबले. महाराष्ट्रात सुद्धा खासदार किती निवडून आले ते बघा, असे म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केलाय.

काँग्रेस हा जनमानसातला विचार

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाला संपवण्याची भाषा करणारे खूप लोक येऊन गेले. काँग्रेस हा जनमानसातला विचार आहे. 135 वर्ष जुनी ही पार्टी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आता समजून घेतलं पाहिजे की एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असं बोलतो. राजकारण एवढं घाणेरड्या लेव्हलला करण्याचा प्रकार झाला आहे. हा प्रकार भाजपने सुरू केला आहे.  मंत्रिमंडळात त्यांचे आमदार बघा, अधिकाधिक लोक हे बाहेरून आलेले आहेत. सगळे उपरे आहेत. स्वतःच्या कार्यकर्त्याला कुठे त्यांनी संधी दिली? असेही त्यांनी म्हटले.

कार्यकर्त्यांवर मला पूर्णपणे विश्वास

दुसरे पक्ष फोडा आणि राज्य करा, ही त्यांची भूमिका आहे. माधव भांडारी यांना का संधी मिळाली नाही? ते कट्टर भाजपचे आहेत. विधान परिषदेला भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना संधी का दिली नाही? भाजप हा बाहेरच्यांचा पक्ष झालेला आहे.  काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहेत. पार्टी बदलणारी मंडळी कोणाचीच नसतात, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि काही दडपण असतं म्हणून ते जातात.  काँग्रेस पक्ष मजबूत आहे, सत्तेशी, स्वार्थाशी जोडलेली मंडळी निघून गेली. आता काँग्रेसमध्ये  उरलेली मंडळी एकनिष्ठ आहेत. कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठ दाखवण्याची आता काँग्रेस कार्यकर्त्यांना गरज आहे. कार्यकर्त्यांवर मला पूर्णपणे विश्वास आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Beed News: बीडला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली, 32 दिवस पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकांनी अजितदादांच्या फोटोला अभ्यंगस्नान घातलं

अधिक पाहा..

Comments are closed.