वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार

मुंबई : वसईविरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचा अखेर जागावाटपाचा तोडगा सुटला. शिंदेंच्या शिवसेनेला 24 जागा तर भाजप आणि इतर घटक पक्षाला जागता वाटप करण्यात आलं आहे. यात आगरी सेना, आर.पी.आय. अजित पवारत्यांची राष्ट्रवादीआंग्रेस पक्ष याना जागा वाटपात सहभागी करुन घेण्यात आलं.

गुरुवारी नालासोपारा येथील भाजप कार्यालयात झालेल्या तीन तासाच्या मॅरेथॉन बैठकीत या जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीत शिवसेना (शिंदे गट) सुमारे 24 जागांवर निवडणूक लढवणार. आणखी 3 ते 4 जागांच्या वाटपाबाबत बोलणी सुरु आहे. त्यावरही लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 2015 पक्षनिहाय निकाल

एकूण जागा – 115

बहुजन विकास आघाडी (BVA) – 106 जागा

भारतीय जनता पक्ष (भाजप)- १ जागा

काँग्रेस (INC) – 0 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) – 0 जागा

शिवसेना – 5 जागा

इतर / अपक्ष – 3 जागा

भिवंडी निवडणूक: भिवंडीत आप स्वबळावर लढणार

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) पहिल्यांदाच थेट महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असून, पक्षाने ही निवडणूक कोणशीही युती न करता स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 0 जागांसाठी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले उमेदवार शोधण्याची प्रक्रिया वेगात सुरू असल्याची माहिती भिवंडी शहर अध्यक्ष मसिह इकबाल आणि महासचिव हणमंत जाधव यांनी दिली आहे .

सध्या पक्षाकडून 2 ते 30 जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक छाननी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित जागांसाठी संघटन विस्तार, प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत्यामुळे. भिवंडी शहरातील खड्डेमय आणि अपूर्ण रस्ते, मोहल्ला क्लिनिक, पसरलेला भ्रष्टाचार, अपुऱ्या आरोग्य सुविधा, पाणीटंचाई, स्वच्छतेचा अभाव आणि नागरी सुविधांचा बोजवारा या प्रमुख मुद्द्यांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार आहे.

दिल्ली व पंजाबमध्ये राबवलेल्या शिक्षण, आरोग्य आणि पारदर्शक प्रशासनाच्या मॉडेलचा अनुभव भिवंडीकरांना देण्याचा प्रयत्न असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. जनतेच्या पैशाचा हिशेब, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि मूलभूत सुविधांवर भर हा पक्षाचा मुख्य अजेंडा असणार आहे.

आतापर्यंत प्रस्थापित पक्षांमधील राजकारणाने त्रस्त झालेल्या नागरिकांना एक नवा, पर्यायी आणि विश्वासार्ह पर्याय देण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टी मैदानात उतरल्याने, भिवंडी महापालिका निवडणुकीत यावेळी राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.