स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर वसंत मोरेंनी सुरक्षा केबिन फोडली; आता अजित पवारांचा कारवाईचा इशार

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena UBT) आक्रमक पवित्रा घेतला होता. ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More)  यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली होती. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे  (Vasant More) यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. या ठिकाणी 20 सुरक्षारक्षक असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता, तर या तोडफोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वसंत मोरे  (Vasant More) यांना फोन करून या भूमिकेनंतर त्यांचं आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जागते राहा असं म्हटलं होतं, त्या वसंत मोरेंच्या (Vasant More) आक्रमकतेनंतर आणि तोडफोडीनंतर आता मोरेंच्या आणि पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्यावरती कारवाईचा इशारा दिला आहे.

राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात…

वसंत मोरे यांनी बस स्थानकात केलेल्या तोडफोडीवर पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर बोलताना अजित पवारांनी कारवाईचा इशारा दिला आहे. तोडफोड करणाऱ्या कार्यकर्ते, पक्ष किंवा नेत्यांकडून हे पैसे वसूल केले जातील, असं न्यायालयाचा एक निर्णयाचा आधार देत अजिक पवारांनी म्हटलं आहे. पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर, स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केला पाहिजे असं कोर्टाने सांगितलं आहे. राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय त्यांनाही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणालेत अजित पवार?

स्वारगेट परिसरात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी तोडफोड केली होती, त्यावर प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, या प्रकरणाचा तपास होऊ द्या. सगळं समोर येऊ द्या. जे लोक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांना मोकळं सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून मग तुम्ही काही स्वतःच्या घराचा काचा फोडत बसाल का? की घरच्या खुर्च्या तोडाल? तिथं तुम्ही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागे कोर्टाने सांगितलेला आहे, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान जर कोणी करत असेल तर, तो पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, तर त्या पक्षाकडून ती सर्व वसुली झाली पाहिजे. त्यामुळे राग सगळ्यांना येतो. त्याबद्दल दुमत नाही. परंतु, राग व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे जगाला माहिती झालेलं आहे आणि अशात फार काहीतरी आम्ही अव्वाच्या सव्वा करायला लागलेलो आहोत आणि राज्याच्या सर्व देखभालीची जबाबदारी यांच्यावरच सोपवली आहे, हे काही जणांचं अति उत्साहात काम चाललेला आहे, त्यांना कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे

https://www.youtube.com/watch?v=uiabcf6_mhw

अधिक पाहा..

Comments are closed.