सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृती म्हटलं होतं, ते भाजपला चालतं, हर्षवर्धन सपकाळांची टीक

टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर हर्षवर्धन सपकाळ: भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे भाजप संविधानातील महापुरुषांविषयी कायमच आक्षेप घेत आला आहे. टिपू सुलतानाबाबतही भाजपचे (BJP) हेच धोरण आहे. देवेंद्र फडणवीस टिपू सुलतानाच्याविरोधात इतकं पोटतिडकीने बोलतात. पण राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी फडणवीस आणि बावनकुळेंच्या सभा असलेल्या ठिकाणी स्टेजच्या बॅकड्रॉपला टिपू सुलतानाचे (Tipu Sultan) चित्र होते. उद्या टिपू सुलतानाच्या वंशजांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजप त्यांनाही मोठी पदे देईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली. त्यांनी सोमवारी बुलढाणा येथे ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या तुलनेबाबत आपली बाजू सविस्तरपणे मांडली.

‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचे लिहले आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. ‘स्वराज्य हे स्थापन होणारचं होतं. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले’, असे सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असं लिहणारे सावरकर भाजपला चालतात. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

शिवाजी महाराज अद्वितीय आहेत, त्यांचं एकंदरित कार्य आणि कर्तृत्व अद्वितीय आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. मी त्यांच्याविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. मला दोन वेगवेगळ्या कालखंडातील महापुरुषांबद्दल  प्रश्न विचारण्यात आला, त्या संदर्भाने मी बोललो. राज्यात दिवसेंदिवस जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांचे फोटो समकक्ष पातळीवर लावावेत, अशी मागणी आहे, त्याबाबत मला मत विचारण्यात आले होते. त्या अनुषंगाने मी ते वक्तव्य केले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार दिला, ते बहुजनांचे हिरो आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतानाने कार्य केले. त्यामुळे दोघांचा फोटो सोबत लागला तर हरकत नाही, असे मी म्हटले होते. यामध्ये मी कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. पण माझ्या वक्तव्याबाबत ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Harshwardhan Sapkal on BJP: भाजपला संविधान बदलायचे आहे: हर्षवर्धन सपकाळ

भारताच्या संविधानात प्रकरण 16 मध्ये प्रशासनाचा भाग सुरु होतो तिथे टिपू सुलतान आणि झाशीच्या राणीची प्रतिमा आहे. त्या चित्राच्या अनुषंगाने प्रशासनाचा मसुदा लिहला आहे. देशाच्या जडणघडणीत ज्या व्यक्तींचं योगदान आहे, त्या व्यक्तीचं चित्र आपल्या संविधानात आहे. भाजप याविरोधात बोलतच राहणार. कारण भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यामुळेच संविधानातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचा आक्षेप आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

आणखी वाचा

शिवरायांची टिपू सुलतानासोबत तुलना, भाजप आक्रमक होताच हर्षवर्धन सपकाळांनी सावरकरांचं ‘ते’ वक्तव्य बाहेर काढलं, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.