कोस्टल रोडवर वाहतूक वाढली, दररोज 63 हजार वाहनांची नोंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई कोस्टल रोडच्या वापरात गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली असून वाहतुकीत तब्बल सातपट वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या महिन्यात दररोज सरासरी 8,787 वाहने या मार्गाचा वापर करत होती, तर मार्च 2026 पर्यंत हा आकडा वाढून 63,003 वाहनांपर्यंत पोहोचला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

मार्च 2024 मध्ये एकूण 2.63 लाख वाहने या मार्गावरून धावली. एप्रिल 2024 मध्ये हा आकडा 4.36 लाख (दररोज 14,538) झाला. पुढील काळात सातत्याने वाढ होत राहिली आणि मार्च 2026 मध्ये मासिक वाहतूक 18.9 लाखांवर पोहोचली. एकूणच, दोन वर्षांत 3.16 कोटी वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे.

या प्रकल्पामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी प्रवासाचा वेळ 30-40 मिनिटांवरून कमी होऊन 10 मिनिटांपेक्षा कमी झाला आहे. ऑगस्ट 2025 पासून हा मार्ग 24 तास पूर्णपणे सुरू करण्यात आल्याने वाहतुकीत झपाट्याने वाढ झाल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनापासून सी-फेसिंग प्रोमेनेडही नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याने येथे गर्दी वाढल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

Comments are closed.