जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे वाहन दरीत कोसळले.
कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह भागात सोमवारी एक भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना टीटवाल-सिमरी मार्गावर घडली आहे. प्रवाशांनी भरलेले एक सूमो वाहन अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळले आहे. दुर्घटनेनंतर तेथे अफरातफरीची स्थिती होती आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी प्रथम तंगधार येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना प्रभावी उपचारासाठी जीएमसी हंदवाडा येथे हलविण्यात आले. तर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तर दुर्घटनेच्या अचूक कारणांचा शोध घेण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस आणि सबंधित अधिकारी तपास करत आहेत.
Comments are closed.