टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
मुंबई : टाटा ट्रस्टनं सर्वांच्या सहमतीनं वेणू श्रीनिवासन यांची आजीव ट्रस्टी म्हणून निवड केली आहे. ट्रस्टमध्ये काही मुद्यांवरुन अंतर्गत मतभेद सुरु असताना आता मेहली मिस्त्री यांना पुन्हा ट्रस्टी केलं जाणार केल जाणार का हे पाहावं लागेल. वेणू श्रीनिवासन यांचा कार्यकाळ 23 ऑक्टोबरला संपणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांची फेरनियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. टाटा ट्रस्टचं विभाजन होणार अशा चर्चा असतानाच ही नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टमध्ये दोन गट असल्याच्या चर्चा आहेत. एक गट नोएल टाटा यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जातं. तर, नोएल टाटा रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष झाले होते. तर, दुसरा गट रतन टाटांचा निष्ठावंतांचा आहे.
टीव्हीएस समुहाचे मानद चेअरमन वेणू श्रीनिवासन यांची नियुक्ती सर्वांच्या सहमतीनं करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टाटा ट्रस्टकडून या बातमीबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे. आता मेहली मिस्त्री यांची पुन्हा ट्रस्टी म्हणून निवड होणार का याकडे लक्ष लागलं आहे. मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ आपोआप वाढणार की आजीव ट्रस्टी पदासाठी सर्वांची संमती घ्यावी लागेल यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. टाटा ट्रस्टची टाटा सन्समध्ये 66 टक्के भागीदारी आहे. 156 वर्ष जुन्या टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी आहे. यामध्ये 30 लिस्टेड कंपन्यांसह 400 कंपन्या आहेत.
एका सूत्राच्या माहितीनुसार जुन्या प्रथेनुसार ट्रस्टी नुतनीकरण आणि नवी नियुक्ती सर्वांच्या सहमतीनं व्हायला पाहिजे.तर, दुसऱ्या व्यक्तीनं म्हटलं फेरनियुक्ती आपोआप होते आणि ती सर्व ट्रस्टींवर लागू असते. सर दोराबजी टाटा ट्र्स्ट आणि रत्न टाटा ट्रस्टच्या न्यासाच्या 17 ऑक्टोबर 2024 च्या संयुक्त बैठकीचा हवाला देत त्या व्यक्तीनं म्हटलं की हा ठराव घेण्यात आला होता की कोणत्याही ट्रस्टीचा कार्यकाळ संपताना संबंधित ट्रस्टद्वारे कोणत्याही कार्यकाळाच्या मर्यादेशिवाय फेरनियुक्ती केली जाईल. याशिवाय 17 ऑक्टोबर 2024 च्या प्रस्तावानुसार सर्व ट्रस्टींची नियुक्ती दीर्घकालीन आणि आजीव आधारावर केली जाईल. 75 वर्ष वय झाल्यानंतर ट्रस्टीशिप बद्दल फेरविचार केला जाईल.
आणखी वाचा
Comments are closed.