नसरापूर प्रकरणाचा 25 जूनला निकाल
नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी शनिवारी (दि. 20) विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणी सरकारी आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला आहे. अवघ्या 20 दिवसांत अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. खटल्याचा निकाल 25 जून रोजी लागणार आहे.
नसरापूर येथे 1 मे रोजी चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी जलदगतीने तपास करून 1 हजार 100 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी नियमित होणाऱ्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे 16 दिवसांत एकूण 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी आरोपीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती.
Comments are closed.