मोठी बातमी : ‘त्या’ दिवशीच सचिन अहिर यांचं मन वळलं, ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 मराठी Sachin Ahir: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे विश्वासू आमदार समजले जाणारे सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांनृत्य धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तर दुसरीकडे सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांना देखील मोठा धक्का देण्यात आला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते त्यातील सचिन अहिर होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वादळी असून उद्धव थाकेरेंसह ठाकरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मनाला जात आहे. (विधान परिषद उपसभापती निवडणूक 2026)

मराठी Sachin Ahir: उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून सचिन अहिर यांना संधी

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (मराठी) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती होती. खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याचीहे माहिती आहे. दरम्यानविधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, अस आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर तातडीने शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती आहे. तर विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

Sachin Ahir Worli Assembly: वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद, ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

दरम्यानवरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केला आहे. शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का वरळी मतदारसंघाचा विचार केला तर पाहायला मिळतोय.

Sachin Ahir : कोण आहेत सचिन अहिर?

– सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार

– विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी

-वरळीमधून 1999, 2004, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी

-2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी

-26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल

-2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी

– 2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती

– 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत

-30 जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.