एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती प

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 मराठी Sachin Ahir: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (मराठी) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांचं धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

राज्यात नुकत्याच ऑपरेशन टायगरने खळबळ उडाली होती. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार देखील शिंदे गटात येतील, असा दावा करण्यात येत होता. त्यातच आज ठाकरेंचं विधान परिषदमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्याने ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते.

वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद- (Sachin Ahir Join Shinde Group)

मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असा आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर तातडीने शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती आहे.  वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केला आहे शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का वरळी मतदारसंघाचा विचार केला तर पाहायला मिळतोय. (Sachin Ahir Join Shinde Group Latest Marathi News)

सचिन अहीरांचे पक्षांतर का मोठे? (Sachin Ahir Marathi News)

  • सचिन अहिर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय
  • आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिरांनी सोडला होता वरळी विधानसभा मतदारसंघ
  • वरळीत राहणाऱ्या विधानपरिषदेच्या दोन आमदारांपैकी सचिन अहिर एक
  • काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडून सचिन अहिर यांना पक्षात येण्याची ऑफर
  • शिवसेनेत आल्यास उपसभापतीपदाची उमेदवारी देण्याचं शिंदेंचं आश्वासन
  • खा.संजय दिना पाटलांच्या प्रवेशानंतर सचिन अहिरांचा पक्षप्रवेशास तयार
  • सचिन अहिर यांची वरळीमध्ये स्वतःची ताकद, कामगार संघटनांवर प्रभुत्व
  • सहा खासदारांना खेचल्यानंतर सचिन अहिरांनाही घेऊन शिंदेंचा ठाकरे-पिता पुत्रांना मोठा धक्का

कोण आहेत सचिन अहिर? (Who Is Sachin Ahir?)

  • सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार
  • विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी
  • वरळीमधून १९९९,२००४,२००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी
  • २००९ ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
  • २६ जुलै २०१९ ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
  • २०२०मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी
  • २०२२ मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
  • ३० जून २०२६ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत
  • ३० जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

ठाकरे गटाचे विधानपरिषदेतले आमदारांची यादी- (Shivsena UBT Vidhan Parishad MLA List)

  • सुनिल शिंदे
  • ज.मो.अभ्यंकर
  • अंबादास दानवे
  • मिलिंद नार्वेकर
  • सचिन अहिर (आता शिंदे शिवसेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज)
  • अनिल परब

संबंधित बातमी:

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: नीलम गोऱ्हे नव्हे, उपसभापतीसाठी शिवसेनेतून 2 जणांमध्ये चुरस; एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र?, स्मार्ट खेळीकडे सगळ्यांचं लक्ष

Comments are closed.