काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूर

काँग्रेस विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस (Deadline) आहे. दरम्यान या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. असे असताना अखेरच्या क्षणात काँग्रेसद्वारेहे आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केले केली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 8 जागेवर निवडणूक लढत आहे. त्यातील काही नावांची घोषणा झाली असली तरी अजूनही काही जागांसाठी पेच राखले आहे. दरम्यान, काँग्रेसनं चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, लातूर आणि सोलापूरमधील उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असून काँग्रेसने स्थानिक पातळीवर तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी दिलीय. मात्र, भंडारा आणि नागपूरमधील उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी असून त्या जागांवरील सस्पेन्स अद्याप कायम आहे.

विधान परिषद काँग्रेस उमेदवारांची यादी (Vidhan Parishad Election 2026 Congress Candidate List)

1) चंद्रपूर वर्धा – शैलेश देशमुख

2) अमरावती – हर्षदीप देशमुख

3) यवतमाळ – साहेबराव कांबळे

4)लातूर – महेश देशमुख

5)सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर

6) नागपूर-अतुल लोंढे/ दिनेश ढोले

Nagpur News: नागपुरात काँग्रेस पक्षाकडून अतुल पौंडसह अजून एक अतिरिक्त उमेदवार

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याच्या उद्दिष्टाने काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक नागपूरात पार पडली. यात नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात शेवटी चार उमेदवार रिंगणात आहे. यात भाजपकडून राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परिणामी भाजपद्वारे हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केलं होतं. फक्त अखेरच्या क्षणी काँग्रेसने अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांना जबाबदारी दिली आहे. तर सुरेंद्र लोधी, अपक्ष व राजेश जंगले, अपक्ष. असे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यात काँग्रेस पक्षानेच फक्त अतिरिक्त उमेदवार दिला आहे.

भंडारा – गोंदिया विधान परिषद निवडणूक उमेदवाराबाबत काँग्रेस अजूनही संभ्रमावस्थेत

भंडारा – गोंदिया विधान परिषदेची काँग्रेसची उमेदवारी कोणाला जाहीर होणार याकडे सर्वांचे नजारा लागल्या असताना आज शेवटच्या दिवशीही काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराची अद्याप घोषणा केलेली नाही. उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात ठेवल आहे, आणि ४ जूनला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव क्लियर होईल, असं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस  पक्षाकडून गोंदियाचे माजी आमदार दिलीप बनसोड हे मुख्य उमेदवार तर त्यांच्या सपोर्टेड प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांचे नामनिर्देशन फॉर्म दाखल करत असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. नेमका काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत ४ जूनला चित्र स्पष्ट होईल, असे संकेत नाना पटोले यांनी माध्यमाची बोलताना दिले. महाविकास आघाडीकडून नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशीही अधिकृतरित्या कुठल्याही उमेदवाराची घोषणा न झाल्याने आता मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल आहे.

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून

आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा? (Vidhan Parishad Election 2026)

आधीचे आमदार कोण?-

आणखी वाचा

Comments are closed.