डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा 11 महिन्यात निकाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना अकरा महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी आता मालेगाव फास्ट ट्रॅक कोर्टाने आज निकाल दिला असून चिमुकलीचे लचके तोडणारा नराधम विजय खैरनार (वय – 24) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 16 नोव्हेंबर 2025 रोजी तीनवर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले. विजय खैरनार याने चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेचे अपहरण केले आणि त्यानंतर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी विजय खैरनार याला मालेगाव पोलिसांनी अटक केली होती. नराधम विजय खैरनार याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तीन आठवड्यांच्या आता चार्जशीट दाखल केली होती. गेल्या अकरा महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. 24 साक्षीदारांच्या तपासणीनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते आणि शुक्रवारी त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

Comments are closed.