ठाकरे बंधू एकत्र आल्याने बावनकुळेंची चिंता वाढली; त्यांनी दोनदा वारी करावी : विजय वडेट्टीवार
विजय वाडेटीवार नागपूर : मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष सोहळ्यानं वरळीतील (Mumbai) डोम सभागृह अक्षरक्ष: दणाणून गेलं. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मराठीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे बंधूंच्या ग्रँड सोहळ्यातील भाषणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान याच मुद्द्यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. या विजयी मेळाव्याला काँग्रेसला बोलावलं किंवा नाही याची चिंता चंद्रशखेर बावनकुळे यांना केव्हापासून पडायला लागली? बावनकुळे यांनी आता स्वतःची चिंता करावी, कारण दोन बंधू एकत्र आल्यानंतर आता त्यांना चिंता पडली आहे. त्यामुळे त्यांनी दोन वेळा पंढरीची वारी करावी. शिवाय आम्ही का गेलो नाही, हे आम्ही आमचं ठरवू त्यांनी यात पडू नये, अशा शब्दात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रशखेर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.
आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस, विठ्ठल चरणी प्रार्थना
विठ्ठल हा जो त्याच्या चरणाशी जाईल त्याचा आहे, वारी ही संतांची परंपरा आहे. संत हे नेहमी मानवतेचे काम करणारे आहे. तुकोबा, ज्ञानोबा गोराकुंभार, संत एकनाथ, चोखामेळा, नामदेव ही एक मोठी परंपरा महाराष्ट्रातील संतांची आहे. वारी ही संतांनी सुरू केलेली वारी आहे आणि ही एकतेची वारी आहे. अनिष्ट प्रथा विरुद्ध वारी आहे. माणुसकीची आणि माणसाला माणसाशी जोडणारी वारी आहे. मतभेद आणि अनिष्ट मिटविण्यासाठी ही वारी आहे. महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा आणि एकोप्याने समाजाचा उद्धार व्हावा, यासाठी वारी आहे. जातपात धर्मपंथ विसरून दुरावा संपुष्टात आणून विठोबाच्या चरणी लीन होऊन पंढरीच्या पांडुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस अशी प्रार्थना विठ्ठल चरणी आहे. अशी बोलकी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पंढरीचे पांडुरंग म्हणजे कृष्णांचा अवतार आम्ही मानतो. राधाकृष्ण ज्याप्रमाणे होते आणि ते भक्तांच्या भक्तीला धावून येत होते, विठ्ठल रुक्मिणी म्हणजे राधाकृष्ण असं समजलं जातं, अशी आख्यायिका आहे. मी सगळ्या बांधवांना सगळ्या वारकऱ्यांना आषाढीच्या शुभेच्छा देतो. असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी आषाढीच्या वारीबद्दल भाष्य करत शुभेच्छा दिल्या.
माझ्यासारखा नेता सुद्धा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये घडला- विजय वडेट्टीवार
आमदार संजय गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झाला. माझ्यासारखा नेता सुद्धा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये तयार झाला. मी आता काँग्रेसमध्ये असलो तरी बाळासाहेबांच्या नेतृत्वात तयार झालो आहे. बाळासाहेबांनी कधी जात-पात धर्मपंत मानला नाही. आता दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना इतका पोटशूड आणि वेदना का होते हे समजत नाही? छत्रपतींच आणि जिजाऊंचे नाव घेऊन त्यांना मूर्ख केलं असे म्हणणं हे अकलेचे तारे तोडण्यासारखं आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची अवलाद आता निर्माण व्हायला लागली आहे आणि हीच जनता महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अवलादीचा सुपडा साफ करेल, अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.