हनीट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, व्हिडीओ दाखवून लोढांकडून 200 कोटींची वसुली
विजय वाडेटीवार नागपूर : काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या हनी ट्रॅप (मध सापळा) संदभर्भातील वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. राज्यात समोर आलेल्या 72 अधिकाऱ्यांच्या आणि हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातचया प्रकरणात महत्त्वाचं कनेक्शन असलेले भाजप नेता प्रफुल्ल लोढा असल्याची चर्चा होता असताना यां संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काही आरोप करत टीका केली आहे. लोढा वर गुन्हा दाखल झाला आहे. बाकीचे खूप लोक यात आहे. मग ते कोणत्याही पक्षाचा असो, त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुरावे तपासले पाहिजे. मोठ रॅकेट यात सक्रिय होते. पन्नास लोक यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अडकले आहेत. असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
दरम्यान, या ठिकाणी मोठे अधिकारी आजी-माजी मंत्री अनेक मोठे मासे अधिकारी यात ट्रॅप झाले आहे. लोढाने अनेकांकडून पैसे घेतले. यात व्हिडिओ असणाऱ्याकडून पैसे घेतले आहे. किमान 200 कोटी रुपये त्यांनी वसूल केले असल्याची माहिती जोरात सुरू आहे. तो कोणाचा कार्यकर्ता आहे, मी यावर बोलणार नाही. हे उघड लवकर होईल. मात्र झाकलेले चेहरे आहे ते बाहेर येईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अशा गोष्टीला समर्थन आहे का?- विजय वडेट्टीवार
सुरज चव्हाण यांनी एवढ्या मोठ्या आणि चुकीच्या पद्धतीनं कार्यकर्त्याला मारलं, एखाद्या पोलीस छोट्या मोठ्या घटनेत लगेच उचलतात. मात्र यात तसे काही झालं नाही. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अशा गोष्टीला समर्थन आहे का? याचा खुलासा करावा, नाहीतर सुरज चव्हाणला अटक करावी, अशी विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
रमी खेळणारा मंत्री कृषीमंत्री आहे अस आम्ही सांगू का?- विजय वडेट्टीवार
या सरकारला थोडी तरी लाज शरम आहे का? की त्यांनी ती हि विकून खाल्ली आहे. जो व्यक्ती शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सभागृहात रमी खेळतो, असे बेजबाबदार वक्तव्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये. अन्यथा त्यांना त्याच्या पादावर एक मिनिटही न ठेवता कारवाई करावी. शेतकऱ्यांसंदर्भात उदासीन सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्राला पाठीशी घालणार आहे का? रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे अस आम्ही सांगू का? असा संतप्त सवाल हि विजय वडेट्टीवार यांनी केलाय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्त्यव्यावर ते बोलत होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.