बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते तर तुम्हाला देशात राहण्याचा अधिकार आहे का? वडेट्टीव

गिरीश महाजन आणि विजय वडेट्टीवार: प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून, गिरीश महाजन यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Girish Mahajan and Vijay Wadettiwar: नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाजच वाटते. संविधान निर्माण करताना त्याला विरोध करणारी ही मंडळी आहे. त्यांचा संविधानावर विश्वास आहे का? बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटत असेल तर यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत त्यांना या देशात खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? संविधान निर्मात्याचे नाव घ्यायला लाज वाटते तर हे हुकूमशाही की लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले याचे उत्तर जनता मागेल, असा हल्लाबोल त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलाय.

Girish Mahajan: नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित करत मंत्री महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

आणखी वाचा

Girish Mahajan: मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? गिरीश महाजनांच्या नव्या वक्तव्याने वाद आणखी चिघळला

आणखी वाचा

Comments are closed.