सुनेत्रा पवारांच्या विरोधात मुलगा उभा राहिला; वडील विजयराव मोरे म्हणाले, शरद पवारांपेक्षा मी दो
बारामती विधानसभा निवडणूक 2026 बाबत विजयराव मोरे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती पोटनिवडणुकीचा (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास मी निवडणुकीतून माघार घेणार अशी आकाश मोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तर आता आकाश मोरे यांचे वडील विजयराव मोरे यांच्यासोबत एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
आकाश मोरेंचे वडील विजयराव मोरे काय म्हणाले? (Baramati Vidhan Sabha By Election 2026)
शरद पवार फक्त कुटुंबापुरता विचार करु लागलेत. वयोपरत्वे त्यांच्यातील राजकारणी बदललाय. जर त्यांनी या पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाचा उमेदवार दिला असता तर आम्ही त्यांचा प्रचार केला असता. मी शरद पवारांपेक्षा दोन महिन्यांनी मोठा आहे. मला त्यांच राजकारण चांगलं ठावूक आहे, असं विजयराव मोरे म्हणाले. अदानी हे शरद पवारांचे मित्र आहेत आणि त्यांच्या संस्थेला त्यांनी मदत केली आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही शरद पवारांच्या उमेदवारांचा प्रचार केला, मात्र सुप्रिया सुळे या भाजपच्या जवळ गेल्याच चित्र आहे, असंही विजयराव मोरे यांनी सांगितले. (Vijayrao More On Baramati Vidhan Sabha By Election 2026)
आजही माझे शरद पवारांसोबत सलोख्याचे संबंध- विजयराव मोरे (Vijaykumar More On Sharad Pawar)
माझ्या राजकारणाची सुरुवात समाजवादी पक्षातून झालेली आहे. 1967 ला मी शरद पवारांच्या विरोधात प्रचार केला. 1972 ची निवडणूक मी शरद पवारांच्या विरोधात लढवली. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर मी काँग्रेसमध्ये दाखल झालो. 1990 साली मला कॉंग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी दिली त्यामध्ये शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्यामुळेच आमदारकी मिळाली. मात्र 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत गेलो नाही. आजही माझे शरद पवारांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. जर त्यांनी मला फोन केला असता तर ही पोटनिवडणूक लढवा, असं मी त्यांना सांगितलं असतं, असं विजयराव मोरे म्हणाले. तसेच अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा हा प्रचारात असेल. अजितदादांना बदनाम करुन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असा दावाही विजयराव मोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
कोण आहेत आकाश मोरे? (Who Is Akash More Baramati Candidate?)
आकाश मोरे हे काँग्रेसच्या विचारधारेने प्रेरित असून ते बारामती (पुणे जिल्हा) परिसरात सक्रिय आहेत. ते माजी आमदार विजयराव मोरे यांचे सुपुत्र आहेत. आकाश मोरे पेशाने वकील (Advocate) आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून ते विविध सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नांवर काम करतात. आकाश मोरेंनी त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.