गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला; गिरीजा रा
विनायक राऊत सून गिरीजा राऊत : ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील (BMC) नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawdi Police Station) हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत यांनी सासरच्यांवर खळबळजनक आणि हादरवून सोडणारे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमचा विश्वासघात केला. आधी सांगितलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतर पूर्ण चित्रच वेगळं दिसून आला. आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ गितेश आणि त्याच्या परिवाराकडून करण्यात आला. सात वर्ष माझा छळ केला. त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे, सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला गितेश सोबत चांगला संसार करण्यासाठी आम्ही कसलीच तक्रार केलेले नव्हती. आज ना उद्या परिस्थिती बदलेल, या आशेवर सगळं सहन करत गेली. पण असे काहीही घडले नाही. ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे सांगितलेले आहे ते नितांत खोटे आहे. त्याने जे माझ्यासोबत केलेले आहे ते लपवण्यासाठी आता ते खोटे बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता
गिरीजा राऊत पुढे म्हणाल्या की, डिसेंबर 2017 साली लग्न झाल्यापासून 2018 पर्यंत आमच्यात कुठलेही शारीरिक संबंध झाले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या कुटुंबाने बसून बोलणी देखील केली. असे ठरले होते की, गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर आपण काम करू. गणपतीवरून आल्यानंतरच अशी घटना घडली की, त्यांनी त्या घटनेला अघोरी इलाजाचे स्वरूप दिले. सप्टेंबर 2018 पासून 2022 पर्यंत त्याने ते सुरू ठेवले. ज्यात अघोरी कृत्य करण्यात आले. मला त्याने प्रचंड त्रास दिला. वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी मला घेऊन जायचे. बाबा त्यांच्या परीने इलाज करायचे. कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवायचा. कोणी कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार, माशांचे तुकड, माझ्या अंगावरचे न धुतलेले कपडे घेऊन डोक्यावरचे केस ओढून उतारे करायचे. गोमूत्र किंवा हळद खायला देणे, असे विचित्र प्रकार माझ्यासोबत करण्यात आले. गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे हे लपवण्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅनिंगनुसार माझं आयुष्य बरबाद केलं.
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut : कुटुंबप्रमुख म्हणून विनायक राऊत अपयशी; सूनेचा थेट आरोप
माजी खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेवर बोलताना गिरीजा राऊत यांनी सांगितले की, “विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ज्या घरी राहतो ते झोपडपट्टीत आहे. लग्नाच्या बोलणीपासून आम्हाला कधीही सांगण्यात आले नव्हते की दुसरे घर हे झोपडपट्टीमध्ये आहे. विनायक राऊत हे नवरात्रीला घट बसतात त्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी फक्त दोनच दिवस आमच्या घरी यायचे, इतर वेळेस ते कधीही आमच्या घरी आलेले नाहीत. फोनवरून मला सांगायचे की, ‘तू ही जिम्मेदारी घे, ती जिम्मेदारी घे’, पण त्यांनी कधीही त्यांच्या मुलाला आणि बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही. एक कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या सासऱ्यांनी जे सांगायला पाहिजे होते, ते त्यांनी कधीही केलेले नाही,” असा आरोप देखील त्यांनी केला.
Vinayak Raut: विनायक राऊत यांनी आरोप फेटाळले
या आरोपांवर विनायक राऊत म्हणाले की, मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.
आणखी वाचा
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Comments are closed.