पतीशी भांडण करून घर सोडले; विरारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पतीशी भांडण केल्यानंतर घर सोडून विरारमध्ये आलेल्या महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. मध्यरात्री डोंगरपाडा परिसरात आलेल्या या महिलेला पत्ता शोधून मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याबाबत पीडितेने तक्रार करताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तीनही आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे.

पीडित महिला ४० वर्षांची असून ती मुंबईत राहते. तिचे पती खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. २४ जूनच्या रात्री तिचे पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे तिने घर सोडले आणि ती विरारमध्ये आली. विरार पूर्वच्या डोंगरपाडा येथील साई नक्षत्र इमारतीजवळ ती उतरली. त्यावेळी रात्री अडीचच्या सुमारास तिघांनी पीडितेला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच परिसरात नेऊन अत्याचार केला, अशी तक्रार महिलेने विरार पोलीस ठाण्यात केली आहे.

नावे सांगितली, मोबाईल नंबरही दिला

तेजस, दीपक अशी त्यातील दोघांची नावे आणि मोबाईल क्रमांक तिने पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी विरार पोलिसांनी महिलेचा पती आणि वडिलांचा जबाब नोंदवला आहे. महिलेच्या माहितीत विसंगती आहे. परंतु आम्ही तिच्या तक्रारीनुसार सर्व अनुषंगाने तपास करत आहोत, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली.

Comments are closed.