शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केल
विराट कोहली-शुबमन गिल आयपीएल फायनल आरसीबी विरुद्ध जीटी : आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये किंग विराट कोहलीने पुन्हा एकदा तो जगातील सर्वोत्तम चेस मास्टर का मानला जातो, हे सिद्ध करून दाखवले. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत सलग दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. या विजयासह आरसीबी सलग दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी इतिहासातील तिसरा संघ ठरला.
विराट कोहलीने अवघ्या 25 चेंडूंमध्ये आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने 42 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि सामनावीराचा मान पटकावला. मात्र या ऐतिहासिक विजयाआधी मैदानावर एक जबरदस्त नाट्य रंगले, ज्यामुळे काही क्षण संपूर्ण स्टेडियमची धडधड वाढली होती.
63 धावांवर विराट ‘आऊट’, पण मग… (Shubman Gill controversial catch in IPL Final)
आरसीबीच्या डावादरम्यान विराट कोहली 63 धावांवर फलंदाजी करत असताना गुजरातचा गोलंदाज अरशद खान याच्या चेंडूवर त्याचा फटका नीट बसला नाही. चेंडू हवेत उंच गेला आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने पुढे झेपावत लो कॅच पकडल्याचा दावा केला. गिलसह गुजरातच्या खेळाडूंनी जल्लोष सुरू केला आणि मैदानावरील पंचांनीही विराटला बाद घोषित केले. कोहली निराश होऊन मैदानाबाहेर जाण्यास निघाला होता, मात्र त्यालाही कॅचबाबत शंका होती. त्यामुळे पंचांनी अंतिम निर्णयासाठी थर्ड अंपायरकडे दाद मागितली आणि विराट पुन्हा क्रीजवर परतला.
𝙁𝙞𝙧𝙨𝙩 𝙩𝙞𝙢𝙚 𝙬𝙖𝙨 𝙨𝙤 𝙣𝙞𝙘𝙚, 𝙩𝙝𝙤𝙤𝙮 𝙙𝙤 𝙞𝙩 𝙩𝙬𝙞𝙘𝙚 ❤️@RCBTweets तुमचे आहेत #TATAIPL 2026 चॅम्पियन्स 🏆#फायनल | #The FinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/vAqXacHPju
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 31 मे 2026
रिप्लेमध्ये उघड झाले सत्य (Virat Kohli IPL Final RCB vs GT)
जायंट स्क्रीनवर विविध अँगलमधून रिप्ले दाखवण्यात आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. शुभमन गिलने झेल घेताना चेंडू पूर्णपणे त्याच्या ताब्यात आला नव्हता. झेल पकडताना चेंडूचा काही भाग जमिनीला स्पर्श झाल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. थर्ड अंपायरने अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतर हा झेल नीट नसल्याचे स्पष्ट केले आणि मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलत विराटला नॉट आऊट घोषित केले.
विराट कोहली-शुबमन गिल आयपीएल फायनल आरसीबी विरुद्ध जीटी
निर्णयाची प्रतीक्षा सुरू असताना विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यात मैदानावर शाब्दिक वादही पाहायला मिळाला. रिप्ले स्क्रीनकडे बोट दाखवत विराटने गिलशी चर्चा केली. विराटचे मत होते की झेल पूर्णपणे नीट नसल्याचे गिललाही माहिती होते, तरीही त्याने बाद असल्याचा दावा केला. दरम्यान, स्क्रीनवर नॉट आऊट झळकताच संपूर्ण स्टेडियम आरसीबीच्या घोषणांनी दणाणून गेले. जीवनदान मिळाल्यानंतर विराटने हवेत मुठ उंचावत आक्रमक सेलिब्रेशन केले आणि गुजरातच्या आशांवर पाणी फेरले.
जीवनदानाचे सोने
मिळालेल्या या जीवनदानाचा विराटने पुरेपूर फायदा घेतला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत आरसीबीला विजय मिळवून दिला. कोहलीसाठी हा हंगामही शानदार ठरला. त्याने आयपीएल 2026 मध्ये एकूण 675 धावा केल्या. विशेष म्हणजे सलग चौथ्या हंगामात त्याने 600 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो वैभव सूर्यवंशी, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या पाठोपाठ चौथ्या स्थानावर राहिला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.