विराटने पुन्हा मैदान गाजवलं, 13 चौकार, 1 षटकार; कोहलीने गुजरातला धुतलं, रोहित शर्मा शून्यावर बा

रोहित शर्मा-विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी 2025-26: विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या दुसऱ्या फेरीचे सामने आज खेळले जात आहेत. भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेत खेळत आहेत. रोहित शर्मा मुंबईकडून तर विराट कोहली दिल्लीच्या संघाकडून खेळत आहे.

कोहलीने गुजरातला धुतलं, रोहित शर्मा शून्यावर बाद-

विजय हजारे ट्रॉफीत आज मुंबईचा सामना उत्तराखंडविरुद्ध होत आहे. तर दिल्लीचा सामना गुजरात विरुद्ध खेळण्यात येत आहे. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. गेल्या सामन्यात रोहित शर्माने 155 धावा केल्या होत्या. मात्र आज रोहित शर्माला एकही धाव करता आली नाही. तर दुसरीकडे विराट कोहलीने गुजरातविरुद्ध आक्रमक खेळी केली. विराट कोहलीने 13 चौकार आणि एक षटकार ठोकत 61 चेंडूत 77 धावा केल्या. विराट कोहलीने फक्त 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने आंध्र प्रदेशविरुद्ध 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 101 चेंडूत 131 धावा केल्या, ज्यामध्ये 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

रोहित-विराट सामना लाईव्ह पाहता येईल? (Vijay Hazare Trophy 2025-26)

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध होणार नाही. विजय हजारे ट्रॉफीच्या या फेरीत, सर्व 38 संघ एकाच दिवशी त्यांचे सामने खेळत आहेत. बीसीसीआयने फक्त दोन ठिकाणी प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे – अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियम. परिणामी, दिल्ली आणि मुंबईचे सामने टीव्ही किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार नाहीत.

रोहित शर्मा बाद होताच चाहते निराश- (Rohit Sharma विजय हजारे ट्रॉफी)

पहिल्या फेरीत सिक्कीमविरुद्ध 155 धावांची धमाकेदार खेळी केल्यानंतर, रोहितकडून आणखी एक मोठी खेळी होण्याची अपेक्षा होती, परंतु यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. बोराने डावाच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितला बाद केले. रोहितच्या बाद झाल्यामुळे स्टेडियममधील चाहते निराश झाले.

संबंधित बातमी:

Vaibhav Suryavanshi News : 70 सेकंदाच्या व्हिडिओत 14 वर्षांच्या पोराची हायव्होल्टेज खेळी, वैभवचा कहर पाहून थरूर भारावले! थेट गौतम गंभीरला केला मेसेज

आणखी वाचा

Comments are closed.