मोबाईलमध्ये अश्लील फोटो आढळल्यास व्हिसा रद्द

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅनडाहून अमेरिकेला जाणाऱ्या ट्रक चालकांसाठी अमेरिकन सीमेवर कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कॅनडामध्ये वाढलेले अपघात, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांनंतर पंजाबी ट्रक चालकांच्या मोबाईल फोनची तपासणी केली जात आहे. मोबाईलमध्ये अश्लिल फोटो, व्हिडीओ, संशयास्पद व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा शस्त्रास्त्रांचे फोटो आढळल्यास ट्रक चालकांचा परवाना आणि व्हिसा तत्काळ रद्द केला जाईल. सध्या कॅनडा-यूएस सीमेवर प्रवेश करणाऱ्या ट्रक चालकांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याने चार पंजाबी चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Comments are closed.