ममता बॅनर्जींच्या दारुण पराभवनंतर विवेक अग्निहोत्रींचा आनंद गगनात मावेना, म्हणाले…

विवेक अग्निहोत्री यांनी ममता बॅनर्जींबद्दल आनंद व्यक्त केला: पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा भाजपकडून दारुण पराभव झाला. एवढंच काय तर,  स्वतः ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) स्वतः भवानीपूर मतदारसंघातून (Bhabanipur Constituency) निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या, त्याही भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Filmmaker Vivek Agnihotri)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडीओ शेअर करत ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात ‘द बंगाल फाइल्स’च्या (The Bengal Files) रिलीजदरम्यान त्यांना झालेल्या अडवणुकीबाबत भाष्य केलं आहे.

या व्हिडीओसोबत विवेक अग्निहोत्री यांनी सविस्तर कॅप्शन लिहित म्हटलंय की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रदर्शनानंतर ममता बॅनर्जी यांनी मला बंगालमध्ये बंदी घातली होती. चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला होता आणि मला राज्यात प्रवेश करण्यासही परवानगी दिली जाणार नाही, असं सांगण्यात आलेलं…”

तसेच, “गेल्या वर्षी ‘द बंगाल फाइल्स’लाही पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली. आमचा ट्रेलर लॉन्च रोखण्यात आला. आमच्यावर हल्ले झाले, मारहाण करण्यात आली. माझ्याविरोधात डझनभर एफआयआर दाखल करण्यात आले आणि माझ्यावर राज्यात बहिष्कार करण्यात आला. इतकंच नव्हे, तर मला राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठीही जाता आलं नाही…”, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“सर उठाकर चलो…” : विवेक अग्निहोत्री (ममता बॅनर्जीवर विवेक अग्निहोत्री)

विवेक अग्निहोत्री आपली भूमिका मांडताना म्हणाले की, “अलीकडील निवडणुकांपूर्वी त्यांनी बंगालमधील लोकांपर्यंत आपला चित्रपट पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधीच हार मानली नाही. या निवडणुकांच्या काळात ‘#TheBengalFiles’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत (गुप्तपणे) पोहोचेल, याची आम्ही काळजी घेतली. आम्ही हार मानली नाही आणि आमच्या परीनं लढा दिला, याचा आनंद आहे. आणि अखेर… हा अभूतपूर्व विजय… बंगालच्या महान जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय राहू शकता…”

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारकडून ‘द बंगाल फाइल्स’वर कोणतीही अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती. मात्र, सिनेमागृह मालकांनी आपापसांत सहमतीनं हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात कोणत्याही थिएटर मालकाने अधिकृत कारण स्पष्ट करणारं वक्तव्यही जारी केलं नव्हतं.

'द बेंगाल फाइल्स' सिनेमा थॉड्स बद्दल… (बंगाल फाइल्स मूव्ही)

अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ‘द बंगाल फाइल्स’ 1940 च्या दशकात बंगालमध्ये हा सिनेमा, 1940 च्या दशकात, विशेषतः 1946 मधील ‘कलकत्ता हत्याकांडा’च्या वेळी, बंगालमध्ये माजलेल्या हिंसक अशांततेवर आधारित आहे. बंगालच्या इतिहासातील एका अत्यंत क्रूर पर्वामध्ये विचारसरणी, श्रद्धा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याचा संघर्ष यांची कशा प्रकारे जुंपली होती, याचा वेध घेणं हा या सिनेमाचा उद्देश आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Thalapathy Vijay: ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय…’; तामिळनाडू विधानसभेतील थलपती विजयच्या दणदणीत विजयानंतर तृषा कृष्णनचा ‘तो’ VIDEO व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.