संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले….

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणातील आरोपी जेलमध्ये असताना त्यांना व्हिआयपी (VVIP) ट्रीटमेंट मिळते, यावर आम्ही यापूर्वी सुद्धा तक्रार केली होती. आता आम्ही लिखित तक्रार करण्याआधी वाट बघतोय की आम्ही एवढे बोलल्यानंतर आता तरी जेल प्रशासन यासंदर्भात काय वास्तव आहे ते आमच्या समोर मांडतंय का? जर यात काही तथ्य नसेल तर आम्ही तुमचे आभार मानू, अभिनंदन ही करू. पण जर हे खरं असेल तर मग मात्र कारवाई झाली पाहिजे, अशीच आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

धनंजय देशमुख यांचा पोलिसांना सवाल

मागच्या 80 दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये माध्यम वार्तांकन करत आहेत. या प्रकरणाच्या तपासापासून आतापर्यंतच्या घटनांमध्ये माध्यमाने स्वतःहून अनेक माहिती उजेड आणली. मात्र या प्रकरणात एकदा सुद्धा पोलिसांनी आपली भूमिका समोर मांडलेली नाही. त्यामुळे आम्हाला पोलिसाच्या एकूण भूमिकेवर संशय निर्माण झालाय असं मत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यासोबतच खंडणीच्या प्रकरणातले दोषारोप पत्र आज बीडच्या विशेष कोर्टात दाखल केले जाणार आहे.

याच अनुषंगाने राज्यातील सगळ्या यंत्रणा कामाला लावून 80 दिवसात हा तपास पूर्ण केला. आता न्यायालयीन प्रक्रिया लवकर राबवून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी भावना ही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. आम्ही इतर आरोपींना सहारोपी करा म्हणतोय, त्यांच्या संदर्भात ड्राफ्ट तयार होतोय. दोन दिवसांमध्ये आम्हाला कशा प्रकारची कारवाई होते हे समजणार आहे.  उज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून काम पाहणार असल्यामुळे आम्हाला लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे ही ते म्हणाले.

खून करावा अन्  जीवन जगावं ते पण वाल्मिक कराडनेच -जितेंद्र आव्हाड

दुसरीकडे याच मुद्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून टीका केली आहे. खून करावा तो वाल्मिक कराडने आणि जीवन जगावं ते पण वाल्मिक कराडनेच. आपण येडे आहोत. आपण वाल्मिक कराडच्या गँगमधे जाऊन सामील व्हावं. आज जेलमध्ये त्याची बडदस्त राखली जातेय. काहीतरी छोट्या मोठ्या गुन्ह्यात वाल्मिकची पोर जेलमध्ये जातायत आणि त्याच्या बराखीत जाऊन त्याची सेवा करतायत. डोकं दाबायला, पाय दाबायला, हात दाबायला जेलमधे पोरं आहेत. यांना  सिसिटिव्ह फुटेज मागितले तरी ते देणार नाहीत. सोमनाथ सूर्यवंशी याची सीसीटीव्ही फुटेज यांनी दिले नसल्याची प्रतिक्रिया देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.