घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला
वाशिम: वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पत्नीने विहिरीत उडी मारली.पत्नीला वाचवायला पतीनेही तिच्या मागोमाग विहिरीत उडी घेतल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध केली. त्यांना विहिरीजवळ चपला आढळल्याने संशय निर्माण झाला. पाण्यात मृतदेह दिसल्याने गावकरीही हादरले आहेत. (Washim tragic Incident)
नेमके घडले काय?
प्राथमिक माहितीनुसार, सवासनी गावात राहत असलेल्या जगताप दाम्पत्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादाचा मनावर परिणाम झाल्याने पत्नी सीमा जगताप हिने गावा शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीने विहिरीत उडी घेतल्याची बाब लक्षात येताच तिचा पती अमोल जगताप तत्काळ तिला वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता त्या विहिरीत उडी मारली. मात्र,मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने ही मदतीची धडपड निष्फळ ठरली आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
विहिरीबाहेर चपला दिसल्या अन् गावकरी हादरले
दरम्यान, जगताप दाम्पत्य रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना मध्यरात्री गावाजवळील विहिरीशेजारी चपला दिसल्याने संशय निर्माण झाला. अन गावकरीही हादरले. स्थानिकांनी तात्काळ मंगरूळपीर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत आपत्ती व्यवस्थापन आपात्कालीन शोध व बचाव पथकाला संपर्क साधला. बचाव पथकाने तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले आणि काही वेळातच सीमाचा आणि अमोलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मंगरूळपीर पोलीस करीत असून घरगुती वादातून पतीपत्नीच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.