टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कपपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. स्टार ऑलराऊंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतूनंतर टी 20 मालिकेतून बाहेर गेला आहे. वॉशिंग्टन सुंदरला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये साईड स्ट्रेनचा त्रास झाला होता. आता वॉशिंग्टन सुंदर टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचं संकट निर्माण झालं आहे.

वॉशिंग्टन सुंदर यानं न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत  5 ओव्हर गोलंदाजी केली होती. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. मात्र, तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. पहिली वनडे संपल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून बाहेर गेल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं होतं. सुंदरच्या जागी आयुष बदोनीला संघात स्थान देण्यात आलं होतं.

वॉशिंग्टन सुंदर टी 20 मालिकेतून बाहेर

वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेनंतर न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सामन्यांतून बाहेर गेला आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार वॉशिंग्टन सुंदरच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत देखील प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण, टी 20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदर फिट होण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयनं त्यांच्या पत्रकात म्हटलं होतं की गोलंदाजी वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की स्कॅनिंगनंतर बीसीसीआयनं त्याला बंगळुरुच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल होण्यास सांगितलं होतं.

भारत आणि न्यूझीलंड टी 20 सामन्यांचं वेळापत्रक

21 जानेवारी- वीसीए स्टेडियम, नागपूर
23 जानेवारी- एसवीएनएस स्टेडियम, रायपूर
25 जानेवारी- बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी
28 जानेवारी- एसीए-वीडीसीए, विशाखापट्टनम
31 जानेवारी- ग्रीनफील्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी 20 सामने सायंकाळी 7 वाजता सुरु होतील. टी 20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी ही मालिका महत्त्वाची आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी न्यूझीलंड विरुद्धच्या संघात कोणाला स्थान मिळणार हे पाहावं लागेल.

भारताचा न्यूझीलंड आणि टी20 वर्ल्ड कपचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंगटन सनकीपर, आय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.