वसीम अक्रम भारतीय गोलंदाजावर नाराज! म्हणाले, “ज्याला शिकवले तोच आता पाकिस्तानच्या विरोधात….”

वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेटमधील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेले ते एक अष्टपैलू, कर्णधार आणि खालच्या फळीतील एक उत्तम फलंदाजही होते. त्यांनी एकदा नाबाद 257 धावा केल्या होत्या, जी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्यांनी जे यश मिळवले, ते 23 वर्षांनंतरही कायम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 502 विकेट्स घेतल्या, ज्या या प्रकारामधील दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाच्या आहे (पहिल्या स्थानी मुथय्य मुरलीधरण 534 विकेट्स)

जेव्हा 2003 मध्ये भारताच्या एका युवा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कहर गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वेविरुद्धच्या त्या तिरंगी मालिकेत इरफान पठाणने धमाकेदार वनडे पदार्पण केले होते. तो त्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स (16) घेणारा गोलंदाज ठरला होता.

तिरंगी मालिकेनंतर पठाणने पाकिस्तान दौऱ्यातही चमकदार कामगिरी केली होती. त्याने तीन सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही कामगिरी पाहता तेव्हा भारताला आपला वसीम अक्रम मिळाल्याचे वाटले. त्याची शैलीही अक्रम यांच्या सारखीच होती.

पठाणने अक्रम यांच्याकडूनही गोलंदाजीचे धडे गिरवले, मात्र त्याची कारकिर्द दुखापत आणि नव्या पिढीमुळे संपुष्टात आली. पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या टी 20 विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने 16 धावांत 3 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार जिंकला होता. त्याने 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली.

पठाणच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आणि त्याला दिलेल्या टिप्स याबद्दल अक्रम यांनी 1 मिनिट पॉडकास्टवर सांगितले आहे. ते म्हणाले,” 2004 मध्ये पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना इरफान मला भेटला, तेव्हा मी ESPNStar साठी समालोचन करत होतो. तो आमचा मोठा चाहता होता. तो आम्हाला पाहत मोठा झाला. मी त्याला काही टिप्सही दिल्या. त्याने त्याच्या कारकिर्दीची चांगली सुरूवात केली. त्याची ऍक्शन सुरूवातीपासूनच माझ्यासारखी होती.”

“इरफान पाकिस्तानविरुद्ध काही ना काही ट्वीट करत राहतो ही एक वेगळी गोष्ट आहे. आमच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती नाही, त्यांना केवळ उत्तर द्यावे लागते. लोकांकडे खूप आहे आणि हा केवळ एक खेळ आहे. कोणी एक जिंकणार, कोणी एक हरणारच,” असे अक्रम यांनी पुढे म्हटले आहे.

इरफानची पाकिस्तानविरुद्ध आकडेवारी पाहिली तर, त्याला शेजारच्या संघाविरुद्ध गोलंदाजी करायला आवडते, असे दिसते. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 27 विकेट्स, 23 वनडे सामन्यांमध्ये 34 विकेट्स आणि 3 टी 20 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच भारतीय गोलंदाजाने 2006 मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रीकही घेतली आहे. त्याने पहिल्याच षटकात सलमान बट, युनिस खास आणि मोहम्मद युसूफ यांना बाद केले. (Wasim Akram upset with Irfan Pathan ! He said, “The very person I coached is now against Pakistan)

Comments are closed.