आम्ही नाथुरम गोडेसे लेव्ह लेक … साम्राअम्सचा साम्र्राम; वॅडेतेयवार आणि सत्यजित तांबे मध्ये

संगमनेर: कीर्तनातून प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि महायुतीची बाजू उचलून धरणारे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणत असल्याचा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता नवीन वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली. भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काहीजणांनी राजकीय भाष्य करत असल्याचा आक्षेप घेत गोंधळ घातला. यानंतर हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला.

काय घडलं?

याप्रकरणी निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले. यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केली आहे. काल रात्री संग्राम बापू भंडारे यांचा एक व्हिडिओ संगमनेर शहरात व्हायरल झाला व या व्हिडिओत त्यांनी थेट आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका बाळासाहेब अशी धमकी दिली आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आज पत्रकार परिषद घेणार असून ते काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा?

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा समाचार केला आहे, संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का? राजकारण एक बाजूला पण उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने…- सत्यजीत तांबे

सत्यजीत तांबे यांनी संग्राम भंडारे यांना उत्तर देत म्हटलंय, बाळासाहेब थोरात साहेबांवर टिका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही. सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा काही घटना मागील काळात सातत्याने सुरु करण्यात आल्यात. या घटना फक्त राजकीय नाहीत किंवा फक्त थोरात साहेबांशीच संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणाऱ्या एका उद्योगपतीला त्याने “ होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे “ बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली.

आज संगमनेरच्या सहकारी व सहकारी बॅंकांमधील ठेवी आज 7000 कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज 9 लाख लिटर दूध तयार होते, संगमनेर मधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज 7 लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, संगमनेरमध्ये 5 मेडिकल कॉलेज आहेत ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून 25000 मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती आता निळवंडे धरणातून 24 तास स्वच्छ पाणी भेटते. हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व  एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला यात स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टिका ही राजकीय तर आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही !

आणखी वाचा

Comments are closed.