आम्ही ट्रम्प यांना संपवू, अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या पराभवानंतर इराणमध्ये झळकले पोस्टर्स
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा झटका बसला आहे. या पराभवानंतर इराणमध्ये एक पोस्टर सध्या खूप चर्चेचा विषय बनले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पोस्टर लावण्यात आले असून, त्यावर ‘आम्ही ट्रम्प यांना संपवू’ (We Will Kill Trump) असे उघडपणे लिहिण्यात आले आहे.
तेहरानमधील एंघेलाब चौकात लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना लोखंडी सळ्यांच्या मागे एका कैद्याप्रमाणे दुःखी अवस्थेत उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ट्रम्प यांच्यासोबतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचेही फोटो लावण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, नेतन्याहू यांच्या फोटोवर फुली मारण्यात आली आहे. इस्रायलमधील निवडणुकांमध्ये नेतन्याहू यांनाही सरकार स्थापन करण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लक्ष वेधून घेत आहे.
Comments are closed.