Weather Update – पुढील चार दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यंदा मान्सूनचा प्रवास रेंगाळल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर 23 जून रोजी पावसाने देशाच्या बहुतांश भागात हजेरी लावली आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पुढील चार ते पाच दिवसांत कोकण विभागातील काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक असेल. अंतर्गत राज्यात प्रामुख्याने मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

23 जून रोजी मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा व ओडिशाचा उर्वरित भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागात हजेरी लावली. पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तर अरबी समुद्र व गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र व छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशचा काही भाग; तसेच त्यानंतरच्या 3-4 दिवसांत झारखंड व बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती राहिल, असे हवामान विभागाने पुढे नमूद केले.

Comments are closed.