पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पंतप्रधान मोदींचं ‘स्टाईल मेसेजिंग’
पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांची देशभर चर्चा सुरू होती. निवडणुकीदरम्यानच्या प्रचारात झालमुरीचीही चर्चा झाली. त्याला कारणीभूत ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान (पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026) अचानक झालमुरीचा आस्वाद घेणे. पश्चिम बंगालच्या जीवनशैलीतील रोजच्या जगण्याचा भाग असलेला झालमुरी (Jhalmuri) हा पदार्थ त्यामुळे अचानक देशभरात चर्चेला आला. राष्ट्रीय वृत्तमाध्यमांवर , समाजमाध्यमात झालमुरी (PM Modi Jhalmuri) हा पदार्थ बनवणे , झालमुरी खाणे हा ‘ ट्रेडिंग ‘ विषय झाला. निवडणुकीपूर्वी एक दिवस आधी नरेंद्र मोदी फुटबॉल खेळले. पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. आपला पोशाख-पेहराव, भाषा यासह खाद्यपदार्थ ; अशा छोट्या कृतींमधून एक मोठा ‘मेसेज’ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. मतदारांवरही याचा प्रभाव पडतो हे बंगालच्या निकालांमधूनही स्पष्ट झाले. नरेंद्र मोदींच्या या झालमुरी स्टाईल मेसेजिंगचे विश्लेषण केल्याशिवाय बंगाल निवडणुकीचे विश्लेषण अपूर्ण आहे. (West Bengal Election Result 2026)
PM Modi : ममता बॅनर्जींच्या प्रचाराला नरेंद्र मोदींचं कृतीतून उत्तर
महाराष्ट्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर झालमुरी हा कुरमुऱ्याच्या भेळी सारखा प्रकार आहे. परंतु झालमुरी बंगालच्या संस्कृतीशी जोडला गेलेला पदार्थ आहे. भारतासारख्या विविधता संपन्न देशात प्रत्येक ठिकाणची वेगळी भाषा, वेगळी खाद्य संस्कृती, वेगळी जीवनशैली, वेगवेगळ्या सामाजिक आवडीनिवडी असतात. समाजविघातक प्रवृत्ती यामध्ये विभाजनाची कारणे शोधतात तर दुसऱ्या बाजूला काही लोक याच प्रतिकांना एकात्मतेचे निमित्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकं बंगाल निवडणुकीत हेच साध्य केलं.
मोदींच्या झालमुरी खाण्याच्या दृश्यातून बंगाली जनतेला आश्वासक संदेश (West Bengal Election Result 2026)
भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष म्हणजे हा ‘बाहेरचा पक्ष’ आहे, बंगालचा पक्ष नाही, या ममता बॅनर्जींच्या प्रचाराला नरेंद्र मोदींनी कृतीतून उत्तर दिलं. एका स्टॉलवर जाऊन नरेंद्र मोदींनी फक्त झालमुरी खाल्ली. आपला नेता आपले हीत जपणारा आहे, आपली प्राथमिकता ओळखणारा आहे, आपल्यासारखाच आपला नेता आहे, हा विश्वास सर्वसामान्यांना हवा असतो. मोदींच्या झालमुरी खाण्याच्या दृश्यातून बंगाली जनतेला हा आश्वासक संदेश मिळाला. आजच्या राजकारणात, अशी दृश्ये लोकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवतात. असे क्षण नेतृत्व आणि जनता यांच्यातील भावनिक बंध दृढ करतात आणि विश्वास निर्माण करण्यास मदत करतात.
West Bengal Result 2026 : झालमुरी खाद्यप्रकार विकणाऱ्या लाखो विक्रेत्यांनाहे उपाय
झालमुरी हा एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा खाद्यपदार्थ आहे. तसेच झालमुरी सर्व स्तरांतील लोक खातात. निश्चितच त्यामुळे झालमुरी हा एक पदार्थ न राहता बंगालच्या प्रत्येक समाजघटकाला जोडणारे प्रतिक ठरते. झालमुरी विकणारे छोटे विक्रेते हे भारताच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. पीएम स्वनिधी सारख्या योजना केंद्र सरकारने त्यासाठी सुरू केल्या आहेत. पंतप्रधानांनी झालमुरी खाण्याचे ते दृश्य पाहून रस्त्याशेजारी असे छोटे – छोटे खाद्यप्रकार विकणाऱ्या लाखो विक्रेत्यांना किती समाधान वाटले असेल, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अनेकदा जाहिरात तंत्रात खाद्यपदार्थांची जाहिरात करताना मोठे अभिनेते, खेळाडू एखादा पदार्थ खाताना दाखवले जातात. कारण ज्या पदार्थाचे ‘मार्केटिंग’ करायचे असते तो पदार्थ समाजातील मोठे-मोठे ‘सेलिब्रिटी’ खातात, हे संबंधित जाहिरातदाराला सामान्य ग्राहकाला दाखवायचे असते. जाहिरातीत ‘सेलिब्रिटी‘ जो पदार्थ खातात, जे पेय पितात त्याचाच आपणही आस्वाद घेतोय, ही समाधानाची भावना सामान्य माणसाला हवी असते. देशाच्या सर्वोच्चपदावरील व्यक्तीने झालमुरी खाल्ल्यानंतर त्या पदार्थासह एक प्रतिष्ठेची भावना जोडली जाते. झालमुरी विक्रेत्यासाठी ते आत्मिक समाधान असते तर नियमित झालमुरी खाणाऱ्यासाठी तो एक आनंदाचा क्षण असतो.
पीएम मोदी Jhalmuri : नरेंद्र मोदींच्या झालमुरी खाण्याने निकालात दूरगामी परिणामी
मतदारांची मने जिंकण्यासाठी हल्ली वेगवेगळ्या प्रकारे रणनीती आखल्या जातात. सध्या यावर एक मोठी उद्योगव्यवस्था उभी राहिली आहे. ज्यामध्ये उच्चविद्याविभूषित ‘प्रोफेशनल’ राजकारण्यांना रणनीती तयार करून देतात. प्रसिद्धीविषयक मार्गदर्शक सूचना करतात. परंतु यावर अंमलबजावणी तर संबंधित नेत्यालाच करायची असते. नरेंद्र मोदींसारख्या नेत्याला हे स्वतःहून सुचतं. त्यासाठी विशिष्ट भूभागाशी, तिथल्या समाजव्यवस्थेशी एकरूप होण्याची समज आणि प्रगल्भता असावी लागते. असे प्रचारादरम्यान एखादा पदार्थ खाल्ल्याने काय होणार, यामुळे निवडणुकीवर काय परिणाम होणार, याविषयी राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अन्वयार्थ लावले होते. परंतु निवडणूक निकालांनी मात्र नरेंद्र मोदींच्या झालमुरी खाण्याने काय होऊ शकतं, ते दाखवून दिलं आहे.
Narendra Modi: राजकारणात – समाजकारणात प्रत्यक्षासह प्रतिकांनाही महत्त्व
नरेंद्र मोदींच्या झालमुरी खाण्यातून दिसलेल्या सहजस्वभावाचेही विश्लेषण करायला हवे. मोदी सहज चालत-चालत झालमुरी विक्रेत्याकडे गेले. त्यांनी संबंधित विक्रेत्याला झालमुरी किती रुपयांना मिळणार, हे विचारलं. विक्रेता पैसे घ्यायला नकार घेत असतानाही मोदींनी त्याला आग्रह केला. मग खिशातून दहा रुपयांची नोट काढली आणि संबंधित विक्रेत्याला दिली. त्याने विचारलं कांदा खाणार ना, त्यावर मोदींनी होकार दिला. यातून कांदा – लसूण खाण्याविषयी असलेल्या विविध परंपरा, समज, पदार्थभेदांनाही त्यातून उत्तर दिले गेले. त्याने बनवून दिलेली झालमुरी तिथेच उभे राहून नरेंद्र मोदींनी खाल्ली. राजकारणात – समाजकारणात प्रत्यक्षासह प्रतिकांनाही महत्त्व आहे. नेतृत्वाच्या प्रतिकात्मक वागण्या – बोलण्यातून एक ‘मेसेजिंग’ होत असते. समाज त्यात जगण्याचे संकेत शोधतो. राजा तशी प्रजा, या म्हणीमागील तत्वज्ञान हेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकताना केलेले झालमुरी स्टाईल मेसेजिंग महत्वाचे ठरते ते त्यामुळेच!
आणखी वाचा
Comments are closed.