वेस्ट इंडिजची गाडी सुसाट, विजयी हॅट्रिक अन् सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म, कोणाचा पत्ता कट?
वेस्ट इंडीजने सुपर 8 स्पॉट T20 विश्वचषक 2026 वर शिक्कामोर्तब केले: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नेपाळवर 9 गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने ग्रुप सी मधून अधिकृतपणे सुपर-8 फेरीचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे, सलग तिसऱ्या पराभवामुळे नेपाळचा या विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे.
वेस्ट इंडिजचा विजयी सिलसिला #T20WorldCup 2026 नेपाळ विरुद्ध आणखी एका शानदार प्रदर्शनासह विस्तारित आहे 👊
📝: https://t.co/CJzUhQjulG pic.twitter.com/VBGS1YwlVJ
— ICC (@ICC) 15 फेब्रुवारी 2026
विंडीजची विजयाची हॅट्ट्रिक
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरवला. नेपाळकडून दिपेंद्र सिंग ऐरी (58) याने एकहाती झुंज देत अर्धशतक झळकावले. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर नेपाळचा डाव 133 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 4 बळी घेत नेपाळच्या फलंदाजीचा कणा मोडला.
नेपाळवर वेस्ट इंडिजच्या दणदणीत विजयात जेसन होल्डरने बॉलवर बाजी मारली🙌
तो जिंकतो @aramco POTM🏅
📝: https://t.co/CJzUhQjulG pic.twitter.com/uwf1RzDQri
— ICC (@ICC) 15 फेब्रुवारी 2026
134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. कर्णधार शाई होप (61) आणि शिमरोन हेटमायर (46) यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेरीस वेस्ट इंडिजने केवळ 15.2 षटकांत लक्ष्य गाठत एकतर्फी विजय साकारला.
सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म
वेस्ट इंडिजने या स्पर्धेत आतापर्यंत कमालीचे सातत्य दाखवले आहे. 3 सामन्यांत 3 विजय मिळवत त्यांनी 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. नेपाळने दिलेले लक्ष्य विंडीजच्या फलंदाजांनी अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. वेस्ट इंडिजच्या या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट +1.820 इतका जबरदस्त झाला आहे.
नेपाळ स्पर्धेबाहेर
नेपाळच्या संघाला या स्पर्धेत अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. 3 सामन्यांत 3 पराभव पदरी पडल्याने ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांच्या नावासमोर आता अधिकृतपणे ‘E’ (Eliminated) असे लागले असून, उरलेला सामना आता केवळ औपचारिक असेल.
गट क: गुण सारणी
| संघ | समोर | विजय | पराभव | मालमत्ता | निव्वळ रनरेट |
| वेस्ट इंडिज (Q) | 3 | 3 | 0 | 6 | १.८२ |
| इंग्लंड | 3 | 2 | १ | 4 | -0.143 |
| स्कॉटलंड | 3 | १ | 2 | 2 | ०.३५९ |
| इटली | 2 | १ | १ | 2 | -0.352 |
| नेपाळ (E) | 3 | 0 | 3 | 0 | -1.942 |
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.