IND vs WI: टीम इंडियाविरूद्ध मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल! किती सामने खेळणार? वाचा सविस्तर अपडेट

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) दोन्ही संघांमधील मालिकेला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारतात दाखल झाला असून, बर्‍याच काळानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. त्यामुळे मालिकेतील सामन्यांची उत्सुकता वाढली आहे.

विशेष म्हणजे विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा हे देखील या मालिकेत खेळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्साहाचे वातावरण आहे. भारतात पोहोचल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

वेस्ट इंडिजचा संघ भारताविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. (Odi series between IND vs WI) मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबरला होणार असून, त्यासाठी सध्या फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे भारतात दाखल होताच वेस्ट इंडिज संघाला तयारीला सुरुवात करावी लागणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 30 सप्टेंबरला, तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 3 ऑक्टोबरला होईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका सुरू होईल. म्हणजेच दोन्ही संघांमध्ये सलग सामने खेळवले जाणार आहेत.

वेस्ट इंडिजने नुकताच वनडे मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघाची कमान शे होपकडे सोपवण्यात आली असून, याशिवाय जॉन कॅम्पबेल आणि मॅथ्यू फोर्ड यांसारखे आक्रमक फलंदाज संघात आहेत. त्यामुळे भारतासाठी ही मालिका सोपी असणार नाही. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची सुरुवातीपासून शेवटपर्यंत आक्रमक फलंदाजी करण्याची खासियत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सावध राहावे लागेल. याशिवाय गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेरफेन रदरफोर्ड आणि जेडन सील्स यांसारखे दमदार गोलंदाजही वेस्ट इंडिजच्या संघात आहेत.

आतापासून साधारण एक वर्षानंतर वनडे विश्वचषक 2027 होणार आहे. भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीतील हा पहिला टप्पा मानला जात आहे. म्हणजेच या मालिकेपासून भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात होणार आहे. पुढील वर्षीचा वनडे विश्वचषक ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळवला जाणार आहे. मात्र, अद्याप विश्वचषकाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा वनडे संघ: शे होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्ज, आमिर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स.

Comments are closed.