आठ महिन्यापूर्वी मृत्यू, बेवारस समजून अंत्यविधी, ससूनमधून बेपत्ता झालेले प्रकाश पुरोहित आजोबांच
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आलेले प्रकाश पुरोहित हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वीच झाला आणि त्यांच्या पार्थिवावर बेवारस व्यक्ती म्हणून अंत्यसंस्कारही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune Sassoon Hospital Missing Prakash Purohit : काय आहे प्रकरण?
एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपचे शहर प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी त्यांचे सासरे प्रकाश पुरोहित यांना शोधण्यासाठी ससून रुग्णालयच्या प्रशासनाला पत्र पाठवले होते. गेली दोन महिने पुरोहित यांचा शोध घेण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार एबीपी माझाच्या वास्तवमधून उजेडात आल्यानंतर पोलिस प्रशासनासह ससून रुग्णालयाने पुरोहित यांचा शोध सुरू केला होता.
पुरोहित यांना ससूनमध्ये २३ सप्टेंबर २०२४ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर चार डिसेंबर २०२४ पर्यंत उपचार सुरू होते. यानंतर त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपविण्यात आले. मात्र, रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी केली होती. त्यामुळे ससूनमधून रुग्ण कसा बेपत्ता झाला, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
नातेवाईकांनी पुरोहितांना ससून रूग्णालयात सोडून दिल्यानंतर त्यांना उपचारानंतर गायकवाडकडे सोपवलं होतं. मात्र त्यांना पुन्हा ससूनमध्ये १२ डिसेंबर २०२४ ला सोडल्याचा त्याचा दावा आहे. दरम्यान पोलीस या दाव्याची पडताळणी करत आहेत. कालपासून गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे. पुरोहितांचं काय झालं याचा तपास सुरू आहे. मात्र अजूनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
Pune Sassoon Hospital Missing Prakash Purohit : प्रकाश पुरोहित २३ सप्टेंबर २०२४ ला ससुन रुग्णालयात दाखल
प्रकाश पुरोहीत या जेष्ठ नागरिकाचा मात्र ठावठिकाणा लागू शकलेला नव्हता. पुरोहित यांच्या परिचितांकडून पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यात आल्यानंतर मुंढवा पोलीसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्याच्या कोथरुड भागात राहणाऱ्या प्रकाश पुरोहित यांना २३ सप्टेंबर २०२४ ला त्यांच्या नातेवाईकांनी ससुन रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुन्हा पुरोहित यांचे नातेवाईक ससुनकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ससुन प्रशासनाने पुरोहितांना ४ डिसेंबर २०२४ ला दादासाहेब गायकवाडकडे सोपवले होते. गायकवाडचे म्हणणे आहे की त्याने पुरोहितांना पुन्हा ससुनमधे नेऊन सोडले आहे. मात्र ससुन प्रशासनाने याला नकार दिल्याने पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे.
Pune Sassoon Hospital Missing Prakash Purohit : पुरोहितांच्या पत्नीला पोलिसांनी बोलावले
परंतु गायकवाड यांनी रुग्णाला १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा ससूनमध्ये दाखल केले होते. त्यानंतर सात मार्च २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही तीच व्यक्ती आहे याचा ससूनकडे पुरावा नाही, गायकवाड यांनी १२ फेब्रुवारीला दाखल केले, तेव्हा या रुग्णाची नोंद ‘अज्ञात’ म्हणून करण्यात आली होती. पुरोहित यांच्या पत्नीला शुक्रवारी बंडगार्डन पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. पुरोहित यांची ‘बेवारस मृत्यू’ म्हणून नोंद करताना काढलेली फोटो त्यांना दाखवण्यात आले. यावरून पत्नीने त्यांची ओळख पटवली. या प्रकरणी बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटल्याचा अहवाल ससून रुग्णालय प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.