सिंहगडावरून तो तरूण अचानक कुठं झाला गायब? CCTV पाहिल्यावर पोलिसही चक्रावले, प्रकरणात नवा ट्विस्

Pune: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून (Sinhagad Fort) 2 दिवसांपूर्वी मित्रांसोबत फिरायला आलेल्या गौतम गायकवाड (Gautam Gaikwad) हा तरुण बेपत्ता झाला असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून (Pune Rural Police) अजूनही त्या बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे. सिंहगड किल्ल्यावरील (Sinhagad Fort) तानाजी कडा (Tanaji Kada) या कड्यावरून पडून तरुण बेपत्ता होता साताऱ्याचा (Satara) असलेला तरुण मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) फिरायला आला असताना पाय घसरून तो दरीत कोसळला होता. त्याला शोधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सिंहगड किल्ला (Sinhagad Fort), आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), हवेली पोलीस प्रशासन (Haveli Police) कसून तपास घेत आहे. पण आता सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्ह (CCTV) मधून एक नवी माहिती समोर आली आहे.

या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. कालपासून या सगळ्या परिसरात शोध सुरू असताना तरुण अजून सापडला नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. बेपत्ता झालेला तो तरूण सीसीटीव्हीमध्ये (CCTV) दिसत असेल आणि पोलिसांना सापडत नसेल तर हा सगळा प्रकार तरुणाने जाणून-बुजून केला असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे.

24 वर्षांचा गौतम गायकवाड (Gautam Gaikwad) हा साताऱ्याचा (Satara) असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी तो मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) फिरायला आला होता. तानाजी कड्यावरून (Tanaji Kada) तो पाय घसरून तो दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले होते. तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police), हवेली पोलीस (Haveli Police) आणि आपत्ती व्यवस्थापन पथके त्याचा शोध घेत आहेत, पण त्याला अद्याप शोध लागलेला नाही. मात्र आता या सीसीटीव्हीमुळे (CCTV) चर्चा सुरू झाल्या आहेत.

सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये लपताना दिसला

गौतमचा (Gautam) शोध सुरू असतानाच, सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) पायथ्याशी असलेल्या एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये तो पळताना आणि लपताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांसमोर त्याला शोधणं पेच आणि मोठं आव्हान निर्माण झाला आहे. जर तो दरीत पडला नसेल आणि सीसीटीव्हीमध्ये (CCTV) दिसत असेल, तर हा प्रकार त्याने जाणूनबुजून केला असावा, असा संशय पोलिसांना येत आहे.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन व  ग्रामीण पोलीस कर्मचारी व स्थानिक गिर्यारोहण करून या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथक शोध घेत होते, खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, वाऱ्यात बेपत्ता गौतम याचा शोध घेतला, मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री ११ वाजता शोधकार्य थांबवले. आज सकाळी ६ वाजता पुन्हा शोधकार्य सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.