कारचालक ते किरकोळ वादातून मित्राचा खून; पुण्याच्या टोळीयुद्धाचा ‘बकासूर’ निवडणुकीच्या रिंगणात,

पुणे गँगस्टर निवडणूक : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहरात मोठ्या घडामोडी घडल्या. पुण्यातून अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पक्षाकडून अधिकृतउमेदवारी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवार गटाकडून बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर, भावजय लक्ष्मी आंदेकर आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नीला जयश्री मारणेला तिकीट देण्यात आलं आहे. अशातच यामध्ये आणखी एक नाव आहे ज्या नावाने एकेकाळी अख्खं पुणं हादरायचं, ते नाव म्हणजे बापू नायर…  कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर (Bapu Nayar) याने देखील प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिपक मारटकर हत्या प्रकरणात कुमार प्रभाकर नायर हा जामीनावर आहे. अजित पवारांकडून मोक्काचा गुन्हेगार बापू नायरला (Bapu Nayar) उमेदवारी दिल्याचं समोर आलं आणि चर्चांना उधाण आलं.

who is bapu nayar: कोण आहे बापू नायर?

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या नायर कुटुंबाचा बापू प्रभाकर नायर हा मुलगा. त्याचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि बापूने बिबवेवाडी परिसरात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तो अत्यंत सर्वसामान्य आयुष्य जगत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने काही काळ ड्रायव्हर म्हणूनही काम केले. बापू नायरवर हत्येचा पहिला गुन्हा २००१ मध्ये पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला. किरकोळ वादातून त्याने मित्राचा खून केला होता.  तेव्हापासून तो गुन्हेगारी विश्वात शिरला.

who is bapu nayar: आपली टोळी निर्माण केली

बापू नायरने स्थानिक गुंडांच्या साथीने बिबवेवाडी, कोंढवा, धनकवडी तसेच सहकारनगर या भागात  टोळीचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण केले. खूनाचे प्रयत्न, मारामारी, भांडणे, खंडणी अशा गुन्ह्यातून तो या भागातील भाई झाला.

who is bapu nayar: बैजु नवघणेचा खून

बिबवेवाडी तसेच आसपासच्या परिसरात बापू नायर तसेच गुंड बैजु नवघणे यांच्यात वर्चस्वावरुन वाद होते. २०११ मधे नवरात्रात निघणार्या देवीच्या मिरवणूकीत बैजु नवघणे व बापू नायर यांच्यात वाद झाल्यानंतर बापू नायर टोळीने बैजु याचा खून केला होता. त्यानंतर बापू नायर टोळीची पुण्यात दहशत आणखी वाढली. या गुन्ह्यात मोक्काअंतर्गत  कारवाई करण्यात आली होती. मात्र पुढे त्या  गुन्ह्यात नायरची निर्दोष मुक्तता झाली.

who is bapu nayar: गजानन मारणे व बापू नायर एकत्र

कोथरूड भागात गुन्हेगारी करणारा गँगस्टर गजानन मारणे आणि बापू नायर यांच्यात मैत्री झाली. कोथरूड भागात बापू नायरने गजानन मारणे याच्या साथीने केबल व्यवसाय सुरु केला होता.

who is bapu nayar: दहशतीसाठी तोडफोड

बिबवेवाडी व आसपासच्या परिसरात बापू नायर टोळीकडून सातत्याने दहशतीचे साम्राज्य उभे केले जात होते. रस्त्यावरील वाहने तोडफोड करून दहशत माजविण्यात येत होती. त्यामुळे नागरिक भयभीत होत असत.

who is bapu nayar: एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा

बापू नायर याच्यावर २०१५ मध्ये खूनाचा प्रयत्न यासह वेगवेगळ्या कमलांनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात तो अटक होता. त्याचवेळी सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात न्यायालयाने बापू नायरला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.

who is bapu nayar: बापू नायरला मारटकर खूनप्रकरणात अटक

बापू नायर २०१५ पासून कारागृहात होता. तो २०२१ मध्ये कारागृहातून बाहेर आला. दरम्यान, २०२० मध्ये तेव्हाच्या शिवसेना युना सेनेचा नेता दिपक मारटकर याचा खून झाला होता. स्वप्नील मोढवे या खूनातील मुख्य आरोपी, बापू नायर कारागृहातून चेकअपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खूनापुर्वी स्वप्नील मोढवे, बापू नायरला भेटला होता. मारटकर खूनात स्वप्नील याला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील भेट समोर आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, २०२४ मध्ये बापू नायर या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.