बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माच
दानिश मालेवार मुंबई इंडियन्स IPL 2026 मध्ये पदार्पण : आयपीएल 2026 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पाचवेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) मोठे बदल केले आहेत.
🚨अहमदाबाद वरून टॉस अपडेट🚨@gujarat_titans नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला @mipaltan
अपडेट्स ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #खेलबिंदास | #GTvMI pic.twitter.com/sxybdSK0tS
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 20 एप्रिल 2026
विदर्भाच्या दानिश मालेवारची एन्ट्री
मुंबई इंडियन्ससाठी आजचा दिवस खास आहे, कारण दोन युवा खेळाडू आपले आयपीएल पदार्पण करत आहेत. यामध्ये विदर्भाचा 22 वर्षीय स्फोटक फलंदाज दानिश मालेवार याचा समावेश आहे. रोहित शर्माच्या जागी दानिश मालेवारला सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला आज मुंबईच्या निळ्या जर्सीच्या रूपाने मिळाले आहे. दानिश मालेवार व्यतिरिक्त फिरकीपटू कृष्ण भगत देखील आज आपले आयपीएल पदार्पण करत आहे.
21 वर्षीय दानिश मालेवारने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये 11/2 अशी स्थिती असताना शतक झळकावले.
– तरुणाने लक्षात ठेवण्यासारखी खेळी! pic.twitter.com/mFC5gWdWQp
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 26 फेब्रुवारी 2025
दानिश मालेवार; विदर्भाचा उगवता क्रिकेट तारा (Who is Danish Malewar)
विदर्भाच्या मातीतून आलेला दानिश मालेवार सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक आश्वासक नाव म्हणून समोर येत आहे. 8 ऑक्टोबर 2003 रोजी जन्मलेला 21 वर्षीय दानिश, उजव्या हाताचा स्फोटक ‘टॉप-ऑर्डर’ फलंदाज असून तो गरजेनुसार ‘लेग-ब्रेक’ गोलंदाजीही करतो. त्याच्या याच अष्टपैलू क्षमतेमुळे मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
सुरुवात आणि जिद्द
दानिशच्या क्रिकेट प्रवासाची मुहूर्तमेढ ‘सिटी जिमखाना अकादमी’ मध्ये रोवली गेली. तिथे प्रशिक्षक स्वरूपराज श्रीवास्तव आणि नितीन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने खेळाचे बारकावे शिकले. दानिशमधील खेळाप्रती असलेली निष्ठा एका प्रसंगावरून स्पष्ट होते. वयाच्या 12 व्या वर्षी एका दौऱ्यावरून पहाटे 2 वाजता परतल्यानंतरही, त्याने विश्रांती न घेता सकाळी होणाऱ्या 14 वर्षांखालील’ अंतिम सामन्यात खेळण्याचा हट्ट धरला आणि त्यात शानदार शतक झळकावले.
देशांतर्गत क्रिकेटमधील झंझावात
विदर्भ संघासाठी खेळताना दानिशने आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. रणजी करंडक 2024-25 मध्ये 9 सामन्यांत 52 च्या सरासरीने 783 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये मध्य विभागाकडून खेळताना पदार्पणातच 203 धावांची ऐतिहासिक खेळी केली. विशेष म्हणजे, 200 धावा पूर्ण झाल्यावर तो स्वतःहून ‘रिटायर आऊट’ झाला; असा पराक्रम करणारा तो गेल्या 81 वर्षांतील पहिला भारतीय ठरला.
मुंबई संघात मोठा बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
दानिश मलेवार, क्विंटन डी कॉक, नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिस भगत, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर.
गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग-11
शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीध कृष्णा, अशोक शर्मा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.