बारामतीचा पुढचा वारसदार कोण? पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या त्या हालचालींमुळे चर्चांना उधाण,
बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती मतदारसंघाचा (Baramati) वारसदार कोण अशा चर्चा रंगल्या आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरूद्ध पवार होणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) यांच्यासह कुटुंबातले सदस्य सांगत आहेत. मात्र दुसरीकडे पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य आता पवार विरूद्ध पवार लढतीचेच संकेत देत आहेत. कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार (Jay Pawar) हे बारामती अक्षरशः पिंजून काढत आहेत.(Baramati News)
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मतदारसंघात रोज दौरे करत आहेत. गाठीभेटी घेत आहेत. समस्या सोडवण्यावर भर देत आहेत. जो व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्याला बारामतीकर साथ देतील असं युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) म्हटलं आहे. त्यामुळे २०२४ प्रमाणेच २०२९लाही युगेंद्र (Yugendra Pawar) रिंगणात उतरणार यात शंकाच नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनीही बारामती मतदारसंघात अधिकाधीक वेळ देण्यास सुरूवात केली आहे. लोकांच्या सुखःदुखात ते पोहोचतात, नुकसाग्रस्त भागाची पाहणी करतात. जनता दरबार घेऊन प्रश्नही सोडवण्यावर भर देतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं ते सांगत आहेत. तर कर्जत जामखेडमधून राजकारणात जम बसवलेल्या रोहित पवारांचीही बारामतीत एन्ट्री घेण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोललं जातं आहे.(Yugendra Pawar)
Baramati News: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही- सुळे
सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या एका कार्यक्रमावेळी भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही, किमान माझ्याकडून तरी ते होणार नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली होती. त्यावर, आमदार रोहित पवार यांनी भूमिका मांडली. सुप्रियाताईंनी जी भूमिका घेतली भावनिक होऊन घेतली, कदाचित राजकीय देखील असू शकेल. मात्र, पवार विरुद्ध पवार का झालं, भाजपविरुद्ध किंवा महायुतीविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. राजकारणात आज एक आणि उद्या दुसरं असं होतं. त्यामुळे, सध्या जे महायुतीत आहेत, ते महायुतीत राहणार नाहीत तेव्हाच पवार विरुद्ध पवार होणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये आपला विरोध कायम असल्याचे सांगितले. तसेच, अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या भूमिकेशी त्यांनी असहमतीच दर्शवल्याचे दिसून येते.
आणखी वाचा
Comments are closed.