विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Legislative Council Elections) पूर्ण झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील (Legislative Council Elections) सदस्यसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होत्या. संबंधित मतदारसंघांमधून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. परिणामी, गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त आहेत.(Legislative Council Elections)

Legislative Council Elections : निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. नियमानुसार, एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण मतदारसंख्येच्या किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असतील तर त्या मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणूक घेता येते. आता ही अट पूर्ण झाल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.(Legislative Council Elections)

Legislative Council Elections : २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून निवडून येतात

विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. त्यापैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून निवडून येतात. यापैकी १७ जागा सध्या रिक्त असून त्यासाठी निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकांकडे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणांचा थेट परिणाम विधान परिषदेच्या राजकारणावर होणार आहे. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका पार पडल्यास विधान परिषदेतील राजकीय चित्रही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Legislative Council Elections)

१७ जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. ज्या मतदारसंघांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर होऊ शकते.

Legislative Council Elections : रिक्त जागा कोणत्या?

– अहिल्यानगर, सोलापूरठाणे, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणेभंडारा-गोंदिया
– रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूरबीडसंभाजीनगर-जालना
नागपूर

आणखी वाचा

Comments are closed.